Nanded News : राष्ट्रवादी काँग्रेसचा 'प्रतापी' विकासनामा प्रकाशनाच्या वाटेवर !

नागपूर, पिंपरी-चिंचवडप्रमाणे नांदेडचा कायापालट करणार
Nanded News
Nanded News : राष्ट्रवादी काँग्रेसचा 'प्रतापी' विकासनामा प्रकाशनाच्या वाटेवर !File Photo
Published on
Updated on

The Nationalist Congress Party's 'glorious' development manifesto is on its way to publication!

विशेष प्रतिनिधी

नांदेड : मनपा निवडणुकीसाठी आधी भाजपा, त्यानंतर आठ दिवसांनी काँग्रेस वंचित आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा 'प्रतापी' विकासनामा नांदेडकरांसमोर येत आहे. पक्षाध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड व नागपूरचा जसा कायापालट केला तसा नांदेडचा कायापालट करण्याचा निर्धार नांदेडबाहेरील एका आमदाराने केला आहे.

Nanded News
Nanded News : वास्तव्य प्रभाग एकमध्ये; अन् उमेदवारी तीनमधून !

मनपा निवडणुकीची खरी धामधूम नवीन वर्षात सुरू होताच पहिल्याच दिवशी नांदेडकरांसमोर भाजपाचा 'संकल्पनामा' दाखल झाला. आता त्याचे घरोघर वितरण सुरू झालेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा 'प्रताप चिखलीकरमय' विकासनामा प्रकाशनाच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात आले. नांदेडमध्ये आपणच पक्षाचे सर्वेसर्वा आहोत, हे दाखवताना आ. चिखलीकर यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर आणि अनुभवी संघटक व महानगराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांना मुखपृष्ठावर दुय्यम स्थान दिले असल्याचे सांगण्यात आले.

भाजपाच्या जाहीरनाम्यात खा. अशोक चव्हाण यांनी मागील आठ वर्षांत राज्य सरकार आणि मनपा यांच्या माध्यमातून नांदेड शहर व परिसरासाठी कोणकोणती कामे केली पूर्ण झाली किंवा मार्गी लागली, ते ठासून सांगितले; पण राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या जाहीरनाम्यात तसे सांगण्यास वाव मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर चिखलीकर यांनी नांदेडकरांनी ज्यांचे नेतृत्व वर्षानुवर्षे स्वीकारले आणि जपले त्या अशोक चव्हाण यांना कारभारी संबोधत नांदेडचा हा कारभारी बदला आणि राष्ट्रवादीला संधी द्या, अशी साद मतदारांना घातली आहे.

Nanded News
Nanded Political News : भाजपाशिवाय नांदेडचा विकास अशक्य : आ.श्रीजया चव्हाण

'उद्याच्या नांदेडचा विकासनामा' मतदारांसमोर सादर करताना 'राष्ट्रवादी'ने नागपूर-पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर नांदेडचा कायापालट करण्याची घोषणा केली आहे. मनपाच्या २०१७च्या निवडणुकीत भाजपाने राज कॉर्नर ते महावीर चौकपर्यंत शहरात उडाणपूल उभारण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

हा मनोदय आता राष्ट्रवादीच्या विकासनाम्यात विराजमान झाला आहे. बारामतीच्या धर्तीवर नांदेडमध्ये नवीन बसस्थानक, देगलूर नाका परिसरात भव्य रुग्णालय, शहराच्या विविध भागांत लहान मुलांसाठी बालोद्याने, शहर बस वाहतूक, शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या धर्तीवर उत्तर आणि दक्षिण भागात आणखी दोन प्रेक्षागृहे, वेगवेगळ्या भागात स्नानगृहे आणि शौचालये, शहरात एक आर्ट गॅलरी, मनपा शाळांमध्ये सीबीएसइचा अभ्यासक्रम अशी अनेक आश्वासने देण्यात आल्याचे समजते.

पोकर्णांच्या मसुद्यात हस्तक्षेप !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासनाम्यामध्ये 'व्हीजन नागपूर, व्हीजन बारामती, व्हीजन पिंपरी-चिंचवड' असा ठळक उल्लेख आढळून आला. त्यामागची नेमकी संकल्पना कळू शकली नाही. एकेठिकाणी 'उघडा डोळे, नागपूर-पिंपरी-चिंचवड बघा नीट' अशी एक चमत्कारिक घोषणा बघायला मिळाली. 'राष्ट्रवादी'चा विकासनामा महानगराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांनी गेल्या आठवड्यात एकहाती आणि एक टाकी लिहून तयार केला होता; पण नंतर त्यात 'प्रतापी' हस्तक्षेप झाल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news