Waqf Board land
Waqf Board land : 'वक्फ बोर्डा'च्या जागेवर राहणाऱ्या कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवरFile Photo

Waqf Board land : 'वक्फ बोर्डा'च्या जागेवर राहणाऱ्या कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

कायमस्वरूपी भाडे करारपत्र करण्याची मंत्र्यांकडे मागणी
Published on

The issue of families living on Waqf Board land is on the agenda.

धर्माबाद, पुढारी वृत्तसेवा : शहरातील मौलाली नगर, रसिक नगर, इंदिरा नगर, यशवंत शाळा परिसर तसेच फुलेनगर या भागांमध्ये वक्फ बोर्डच्या जागेवर अनेक दशकांपासून वास्तव्यास असलेल्या ३०० ते ४०० कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Waqf Board land
Nanded Political News : निवडून आलेल्या एका नगरसेवकाने तब्बल आठ वर्षांनंतर दाखवले तोंड !

त्यामुळे कायमस्वरूपी भाडेकरार पत्र करा, अशी मागणी बाजार समितीचे माजी उपसभापती व कंत्राटदार मोईजोद्दीन करखेलीकर (बिडीवाले), ताहेर पठाण यांनी अल्पसंख्याक, औकाफ व वक्फ बोर्ड विभागाचे कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांची विशेष भेट घेऊन केली आहे.

शहरातील विविध वस्त्यांतील गोरगरीब कुटुंबांची परिस्थिती, त्यांचे स्थलांतरित होण्याचे वाढते धोके आणि कायदेशीर संरक्षणाची आवश्यकता याबाबत त्यांनी मंत्र्यांसमोर व्यथा मांडली. वक्फ बोर्डाच्या जागेवर ही कुटुंबे अनेक वर्षांपासून या जागांवर कायदेशीर व सामाजिकदृष्ट्या स्थिर जीवन जगत आहेत. त्यांना अचानक बेघर होण्याचा धोका कायम आहे.

Waqf Board land
Ashok Chavan : माझं ऐकणाराच उमेदवार देणार, माझ्या गॅरंटीवर मतदान करा

म्हणूनच सरकारने या कुटुंबांना कायमस्वरूपी भाडेकरार पत्र देऊन त्यांच्या भविष्याला सुरक्षित करावे, या मागणीचे निवेदन कोकाटे यांना देण्यात आले. त्यावर कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे माजी उपसभापती व कंत्राटदार मोईजोद्दीन करखेलीकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news