

An elected corporator showed his face after eight years!
संग्राम मोरे
नवीन नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक २० च्या एका नगरसेवकाने निवडून आल्यापासून आतापर्यंत ढुंकूनही पाहिले नाही. मात्र, आता मनपाची निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने या नगरसेवकाने स्वतःच्या वाढ दिवसनिमित्ताने बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. वॉर्डामध्ये समस्यांचा डोंगर उभा राहिला असून नगरसेवकाच्या वागणुकीचा नागरिकांतून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
सदरील नगरसेवकाचे वॉर्ड क्रमांक १९ मध्ये स्वतःच्या कॉलेजसाठी परिसरातील रस्त्यासाठी यापूर्वी वॉर्ड क्रमांक २० चा निधी वापरला होता. याबाबत नागरिकांनी अनेक तक्रारी करूनही वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांत प्रचंड रोष दिसून येत आहे.
गत निवडणूक काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर या नगरसेवकाने जिंकली होती. नगरसेकाने यंदा भाजपाकडून पक्षश्रेष्ठींकडे तिकीटाची मागणी केल्याची खात्रीशिर माहिती आहे. भाजपने यंदाही तिकीट दिल्यास याचा भाजपला मोठा फटका बसू शकतो.
एका नगरसेवकाने वाढदिवसासाठी कार्यक्रम, बॅनरबाजी, ओल्या पार्टीसह इतर कामांसाठी लाखोंचा खर्च केल्याचे चि; पहावयास मिळत आहे. हा वाढदिवसाचा फंड महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून गोळा केल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. पक्षश्रेष्ठींनी याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भाजपला या भागातून मोठा फटका बसू शकतो.