Nanded News : गुंतवणुकीच्या नावाखाली नांदेडला शिक्षकाने ७८ लाखांना घातला गंडा

संशयित दाम्पत्य फरार, मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता
Nanded News
Nanded News : गुंतवणुकीच्या नावाखाली नांदेडला शिक्षकाने ७८ लाखांना घातला गंडाfile photo
Published on
Updated on

Teacher Swindled Out of ₹78 Lakhs in Nanded Under the Guise of Investment

नांदेड : पुढारी वृत्तसेवा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका शिक्षकाने चौघांना तब्बल ७८ लाख ४६ हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. १३) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी शिक्षक व त्याची पत्नी सध्या फरार झाले आहे. यामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Nanded News
शेअर मार्केटच्या गुंतवणुकीवर १२ टक्के परताव्याचे आमिष दाखवून सव्वाकोटीचा गंडा

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमधील विजयनगर भागात जयश्री गजानन कदम वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराशेजारीच शिक्षक संदीप तंवर आणि त्यांची पत्नी वैशाली तंवर राहत होते. या ओळखीतून तंवर दाम्पत्याने जयश्री कदम यांना आम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपये कमवत आहोत, तुम्हीही पैसे गुंतवा अशी गळ घातली. गुंतवणुकीवर दरमहा ३ ते ५ टक्के व्याजाचे आमिष दाखवून त्यांनी कदम यांचा विश्वास संपादन केला.

तंवर यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जयश्री कदम यांनी मे २०२३ ते जून २०२४ या कालावधीत टप्प्याटप्प्याने ६१ लाख ४६ हजार रुपये दिले. यात चेक, फोन-पे, योनो अॅप आणि रोख रकमेचा समावेश होता. विशेष म्हणजे, कदम यांचे पती पोस्ट विभागात नोकरीला असून त्यांनी कर्ज काढून ही रक्कम तंवर यांना दिली होती.

कदम यांच्यासोबतच गणेश गुंजाराम आंबेकर (५ लाख), रोहित चंद्रकांत कांबळे (७ लाख) आणि आप्पासाहेब माधवराव पाटील (५ लाख) यांनीही तंवर यांच्याकडे गुंतवणूक केली होती. सुरुवातीला काही काळ व्याजाचे पैसे वेळेवर देऊन तंवर यांनी विश्वास टिकवला, मात्र नंतर त्यांनी टाळाटाळ सुरू केली. कदम यांनी पैशांसाठी तगादा लावला असता, तंवर यांनी त्यांना २६ लाखांचे तीन चेक दिले. मात्र, ते चेक बँकेत वटले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जयश्री कदम यांनी पोलिसांत धाव घेतली. तंवर दाम्पत्य सध्या फरार असून आम्ही त्यांचा शोध घेत आहोत, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

Nanded News
Nanded Crime | अहो आश्चर्यम : पोलिसांनीच घातला ६० लाखांचा गंडा

पोलिसांचे आवाहन

या रॅकेटमध्ये इतरही अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक संदीप थडवे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news