Nanded Crime | अहो आश्चर्यम : पोलिसांनीच घातला ६० लाखांचा गंडा

६० लाखांत १ कोटींचे सोने देण्याचे आमिष; दोन अटकेत, दोन फरार
 fraud case
fraud casefile photo
Published on
Updated on

नांदेड : कायद्याचे रक्षण करणाऱ्यांकडूनच कायद्याची पायमल्ली केली जात असल्याने सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचे कारणही तसेच आहे. चक्क दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी अन्य दोघांना सोबत घेऊन एका शासकीय कर्मचाऱ्याला ६० लाखांचा गंडा घातला आहे.

६० लाखांत १ कोटीचे सोने देतो, असे आमिष दाखवून हा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, यातील एक पोलिस कर्मचारी व एका व्यक्तीस अटक केली आहे तर एक पोलिस आणि आणखी एक व्यक्ती अद्याप फरार आहे. दरम्यान, पोलिसांनीच ६० लाखांना फसवल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कमी पैशात दुप्पट पैसे किंवा दुप्पट सोने देण्याचे आमिष दाखवून लुटण्याचे प्रकार भामट्यांकडून आपण नित्यनियमानेच ऐकत असतो आणि तशा घटनाही घडतात. मात्र येथे चक्क दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी अन्य दोन जणांना सोबत घेऊन एका शासकीय कर्मचाऱ्याला ६० लाखांचा गंडा घातला आहे.

 fraud case
Nanded Crime News : पोलिस होण्याचे स्वप्न दाखवून उकळले १० लाख; पोलिस अंमलदार निलंबित

लोहा तालुक्यातील खेडकरवाडी येथील सचिन वालाजी खेडकर (२७) हे शासकीय कर्मचारी आहेत. त्यांना १७ जानेवारी २०२६ रोजी पारडी येथे मुंडे यांचे घरबांधकाम सुरू आहे, तेथे भेटून ६० लाखांत १ कोटी रुपयांचे सोने देण्याचे आमिष दाखविण्यात आले. खेडकर आमिषाला बळी पडले आणि त्यांनी ६० लाख रुपये सोबत आणले. चौघांनी मिळून खेडकरकडून ६० लाख घेतले. त्यानंतर त्याला मारहाण करून धमकी देऊन पाठवून दिले. तसेच तुला बनावट नोटांच्या प्रकरणात अडकवतो, अशी धमकी संबंधितांनी दिली होती.

फसवणूक करणारे पोलिस कर्मचारी राजेश मुंडे (सध्या कार्यरत नांदेड मुख्यालय), ओमकार विश्वनाथ भुरे, समीर साबेरखान पठाण (सध्या कार्यरत लिंबगाव पोलिस ठाणे) व अन्य ३० ते ३५ वयाचा व्यक्ती हे चौघेही पोलिस वेशात होते.

या प्रकरणात सचिन खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहा पोलिस ठाण्यात २३ जानेवारी २०२७ रोजी वरील पोलिस कर्मचारी राजेश मुंडे, समीर पठाण, ओमकार भुरे अन्य एक अशा चौघांविरोधात ६० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघेही फरार झाले होते.

दरम्यान, २९ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक महेश कोरे यांनी ओमकार भुरे याला अटक केली. भुरे याने पोलिस कर्मचारी राजेश मुंडे व इतर जणांनी खेडकरकडून ६० लाख रुपये घेतल्याची कबुली दिली. या प्रकरणातील आरोपी असलेल्या पोलिस कर्मचारी समीर पठाण याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. पोलिस कर्मचारी राजेश मुंडे व अन्य अनोळखी आरोपी अद्याप फरार आहेत.

 fraud case
Hingoli crime : गुगुळ पिंपरीत गांजाची 80 झाडे जप्त

पोलिस आणखी मुंडे व अन्य एका आरोपीचा शोध घेत असून, चार जणांनी ६० लाखांच्या बदल्यात एक कोटींचे कुठले सोने देणार होते की इतर काही कारण आहे, याचा शोध घेत आहेत. यातील पोलिसांनी सचिन खेडकर यांची फसवणूक का केली, त्या मागची कारणे शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत असून, लवकरच याचा उलगडा होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

विश्वास कुणावर ठेवायचा?

कुठलीही अडचण आली आणि अन्याय झाला तर न्याय मागण्यासाठी आपण पोलिसांकडेच जातो. मात्र या प्रकरणात पोलिसांनीच ६० लाखांचा गंडा घातला आहे. नोकरी असूनही पोलिसांना झटपट श्रीमंत होण्याचे वेध लागले होते काय किंवा ते कुणाच्या बतावणीवरून यात ओढल्या गेले होते काय, ही बाब तपासात पुढे येईलच. मात्र सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास कुणावर ठेवावा? झटपट श्रीमंत होण्याचा शॉर्टकट सचिन खेडकर याला किती महागात पडला, हे या उदाहरणावरून लक्षात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news