Mahur Taluka News | शिक्षिका दीर्घ रजेवर; विद्यार्थी वा-यावर: माहूर तालुक्यात शिक्षण विभागाचा बोजवारा

Nanded News | रेवानाईक पार्डी येथील जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकाविना पोरकी
Mahur Revanayak Pardi school issue
रेवानाईक पार्डी येथील शाळेत शिक्षक न आल्याने विद्यार्थी बाहेर बसून होते. (Pudhari Photo)
Published on
Updated on

बाबाराव कंधारे

Mahur Revanayak Pardi school issue

वाई बाजार : माहूर तालुक्यातील शिक्षण विभागाला वालीच उरला नसल्याचे वास्तव समोर येत असून रेवानाईक पार्डी येथील जि.प. शाळेतील नियमित शिक्षिका दीर्घ रजेवर गेल्याने विद्यार्थांना बंद शाळेच्या आवारातच दिवस काढावा लागत आहे. यामुळे माहूर शिक्षण विभागाच्या उदासिन धोरण चव्हाट्यावर आले आहे.

माहूर तालुक्यातील मौजे रेवानाईक पार्डी (बंजारा तांडा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज (दि. २३) हा प्रकार उघड झाला आहे. येथील नियमित शिक्षिका १७ जूनपासून दीर्घ रजेवर गेल्याचे प्रभारी केंद्रीय मुख्याध्यापकाकडून सांगण्यात आले आहे. तर नियमित शिक्षिका रजेवर जाऊन तब्बल सहा दिवस झाले असले तरीही तेथे पर्यायी शिक्षकच उपलब्ध झाला नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क बंद असलेल्या शाळेत दिवस काढावा लागल्याचे वास्तव समोर आले आहे.

Mahur Revanayak Pardi school issue
Nanded News : नांदेड शहरात अमली पदार्थांची खुलेआम विक्री

दरम्यान, शाळेतील सर्व विद्यार्थी बंद शाळेच्या व्हरांड्यात बाहेर बसून गुरूजींची वाट पाहत असताना येथे शिक्षक पाठविण्याची जबाबदारी नेमकी कुणाची..? याबाबत केंद्रीय मुख्याध्यापक ते माहूरचे गटशिक्षणाधिकारी कार्यालय आपले हात झटकत असून एकमेकांकडे बोट दाखवून आपापली जबाबदारी झटकण्यात मश्गुल आहेत.

विशेष म्हणजे माहूरचे गटशिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याने सद्यस्थितीत येथे कुणीही जबाबदार गटशिक्षणाधिकारी नाही. त्यामुळे हे पद केवळ तोंडी आदेशाने एका शिक्षण विस्तार अधिका-याकडे असल्याचे समजते. तर रेवानाईक पार्डी जि.प. शाळेतील नियमित शिक्षिका दीर्घ रजेवर गेल्यानंतर केंद्र असलेल्या वाई बाजार शाळेतून केंद्रीय शाळा या नात्याने चार दिवस पर्यायी शिक्षक पाठवून सोपस्कार पार पाडला.

परंतु, चार दिवसानंतर आज येथील शाळेवर शिक्षक पाठवण्याची जबाबदारी नेमकी कुणाची या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक झाले. उद्या दि. २४ रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला ग्रामस्थांकडून धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. माहूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था दयनीय झाल्याचे दिसून येत आहे. सक्तीच्या शिक्षण कायद्याची प्रत्यक्षात हिच अवस्था का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Mahur Revanayak Pardi school issue
Nanded District Bank : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक : हरिहररावांच्या रिक्त जागी मुलाची वर्णी लागणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news