Teachers News : दिव्यांग अन् रोगग्रस्त असलेल्या शिक्षकांनाही बीएलओची कामे

कामातून सूट द्या : शिक्षक परिषदेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
nanded news
Teacher News : दिव्यांग अन् रोगग्रस्त असलेल्या शिक्षकांनाही बीएलओची कामेfile photo
Published on
Updated on

Teacher News: BLO work for teachers with disabilities and diseases

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना बीएलओ, परीक्षा काळात परीक्षक, बैठे पथकासह निपूण चाचणी अशी अशैक्षणिक कामे दिव्यांग व दुर्धर रोगग्रस्त शिक्षकांवरही लादली जात आहेत. या अशैक्षणिक कामांचा प्रचंड ताण येत असल्याने अध्यापनासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांची अशैक्षणिक कामे काढून घ्यावीत, अशी मागणी एबीअ-ारएसएम संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची भेट घेऊन करण्यात आली आहे.

nanded news
Nanded News : आजपासून नांदेडला सर्व शाळा सकाळी भरणार

शिक्षकांना निवडणूक वगळता इतर कामे न लावण्याचा शासननिर्णय आहे. तरीही महसूल विभाग वीए लओची कामे करण्याचे आदेश देत आहे. सदरची कामे न करणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जात आहे. यापूर्वी झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये शिक्षकांनी काम केलेले आहे. तसेच जनगणनेचे काम पण शिक्षक करत असतात.

त्यातच आता महसूल विभागाच्या वतीने बीएलओचे काम मोठ्या प्रमाणावर प्राथमिक शिक्षकांना देण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्त्-ोवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना या कामातून सूट देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली आहे.

nanded news
Jat crime: जत तालुक्यातील दोघे सहा महिन्यांसाठी हद्दपार

यावेळी विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे, दिगंबर कुरे, जिल्हा अध्यक्ष व्यंकट गंदपवाड, जिल्हा कार्यवाह प्रल्हाद राठोड, जिल्हा कोषाध्यक्ष धोंडिबा पांडागळे, जिल्हा प्रवक्ते रवी ढगे, जिल्हा संघटक संजीव मानकरी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल मुखेडकर आदी उपस्थित होते.

अध्यापनासाठी वेळच नाही

द्वितीय सत्र परीक्षेच्या तयारी प्राथमिक शाळांवर चालू असून यासाठी प्राथमिक शिक्षक वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या तयारीत असताना, जिल्ह्यातील शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर बीएलओचे काम दिल्या जात आहे. यात काही दिव्यांग शिक्षकांनाही व दुर्धर आजार असलेल्या शिक्षकांनाही बीएलओचे कार्य देण्यात आलेले आहे. यामुळे शाळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेळ मिळत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news