Nanded News : 'युवा कट्टा'मध्ये विद्यार्थ्यांनी मांडले परखड विचार

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात चारोळ्या व कवितांनी रंगला कट्टा
'युवा कट्टा'मध्ये विद्यार्थ्यांनी मांडले परखड विचार
'युवा कट्टा'मध्ये विद्यार्थ्यांनी मांडले परखड विचारfile photo
Published on
Updated on

Students expressed candid views at 'Yuva Katta'

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात युवा कट्टा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बुधवारी (दि.२२) नीट पेपर लीक प्रकरण, पर्यावरण परिणाम व जीवनदान, विद्यापीठ शिक्षणाचे अनुभव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शिक्षणातील बदल, युवकांमधील व्यसनाधीनता, बालविवाह व हुंडा पद्धती, कृषी धोरणावर परखड विचार मांडले. तसेच चारोळ्या आणि एकापेक्षा एक सरस कविता सादर करून युवा कट्ट्याची रंगत वाढविली.

'युवा कट्टा'मध्ये विद्यार्थ्यांनी मांडले परखड विचार
Nanded News : मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीवर आज पुन्हा सुनावणी

भारत लोकसेवा प्रसारक, आकाशवाणी परभणी आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व परभणी आकाशवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कुलगुरू डॉ. मनोहर चासकर व प्र- कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात युवा कट्टा या विशेष कार्यक्रम घेण्यात आला. कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार हे अध्यक्षस्थानी होते. तर परभणी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सदानंद कामडी, प्रसिद्ध निवेदिका सुमेधा कुलकर्णी, सुषमा कुलकर्णी आणि डॉ. सुहास पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.

'युवा कट्टा'मध्ये विद्यार्थ्यांनी मांडले परखड विचार
Nanded News : एकाच दिवसात ५६ गुन्हे दाखल, ७९ जण जाळ्यात; पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

या कार्यक्रमात विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. (संशोधक) विद्यार्थ्यांनी विविध समकालीन विषयांवर विचार मांडले. तसेच सुंदर चारोळ्या व कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मारुति गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news