Nanded Civic Polls: घराणेशाही! पत्नी, भाऊ, भावाची पत्नी, मेहुणा, भाच्याची पत्नी.. भाजपनं एकाच कुटुंबातील ६ जणांना दिली उमेदवारी

नांदेडच्या लोहा नगरपालिकेत भाजपकडून माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला तिकीट; विरोधकांकडून जोरदार टीका.
Nanded Civic Polls
Nanded Civic Pollspudhari photo
Published on
Updated on

BJP Faces Nepotism Charges:

भाजप देशभर घराणेशाहीला विरोध करत आपली ताकद वाढवत असताना, नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मात्र चक्क एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली आहे. भाजपला नांदेडमधील महत्वाच्या लोहा शहरात दुसरे उमेदवारच मिळाले नाहीत का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

लोहा शहरातील माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी हे भाजपकडून यंदाही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्याच्या कुटुंबात तब्बल पाच नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत.

Nanded Civic Polls
Local Body Election | स्थानिक पातळीवरच निर्णय,पंकज भोयर यांनी केले स्पष्ट

अशा दिल्या ६ उमेदवारी:

नगराध्यक्षपदाचे उमेदवार: गजानन सूर्यवंशी (माजी नगराध्यक्ष)

नगरसेवकपदाचे उमेदवार:

पत्नी: गोदावरी सूर्यवंशी

भाऊ: सचिन सूर्यवंशी

भावाची पत्नी: सुप्रिया सचिन सूर्यवंशी

मेहुणा: युवराज वाघमारे

भाच्याची पत्नी: रीना अमोल व्यवहारे

Nanded Civic Polls
Devendra Fadnavis: तुमचे चालवून घ्यायचे पण भाजपने केले तर…; शिंदेंच्या नाराज मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले

घराणेशाहीचा आरोप

एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या धोरणांवर स्थानिक पातळीवर प्रचंड टीका होत आहे. भाजपला निवडणुकीत सक्षम उमेदवार मिळत नव्हते, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला का, अशी चर्चा लोहा शहरात रंगली आहे.

यापूर्वी लोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची सत्ता होती. या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपने घराणेशाहीला बळ दिले असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Nanded Civic Polls
Sangli News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बँकांना फटका

एकंदरीत, घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या पक्षानेच एका निवडणुकीत एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे लोह्याचे शहर सध्या चर्चेचे केंद्र बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news