Nanded News : आणीबाणीमध्ये तुरुंगवारी; मग झाले गुरू-शिष्याचे नाते...!

शंकरराव चव्हाण - डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यातील संबंधांतला एक पैलू
Shankarrao Chavan legacy
डॉ. कुमार सप्तर्षी यांना नांदेडच्या बन वैद्यकीय प्रतिष्ठानचा पुरस्कार त्यांचे मित्र व प्रख्यात अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.pudhari photo
Published on
Updated on

नांदेड : आणीबाणीदरम्यान मुख्यमंत्री राहिलेल्या शंकरराव चव्हाण यांनी तत्कालीन विरोधी पक्षीय नेत्यांसह 'युक्रांद'च्या डॉ. कुमार सप्तर्षी यांनाही तुरुंगात पाठविले होते; पण आणीबाणीनंतर पहिल्यांदा आमदार झालेल्या सप्तर्षी यांना विधानसभेतील परिणामकारक भाषणे तसेच इतर आयुधे वापरण्याची दीक्षा शंकररावांनीच दिली होती. सुमारे ५० वर्षापूर्वी त्यांच्यामध्ये काही काळ एका अर्थाने गुरू-शिष्याचे नाते निर्माण झाले होते.

सार्वजनिक जीवनामध्ये काही अपवाद सोडता सत्ता पक्षात नसतानाही शेवटपर्यंत कृतिशील राहिलेले, बहुआयामी कार्यकर्ते व संघटक डॉ. कुमार सप्तर्षी यांना सोमवारी अखेरचा निरोप देण्यात आला. गेल्या शनिवारी सप्ती यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात असताना सप्तर्षी यांच्या नांदेडशी संबंधित काही आठवणी आणि प्रसंगही समोर आले. शंकरराव चव्हाण यांना काही कालावधीसाठी त्यांनी गुरू केले आणि नंतर या दोघांचेही संबंध सौहार्दपूर्ण राहिले.

Shankarrao Chavan legacy
Ashti stray cattle : मोकाट जनावरांसह वराहांचा हैदोस

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या 'व्यक्तिरंग' पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांसह शंकरराव चव्हाण आणि शरद पवार यांच्यावरचे लेख समाविष्ट आहेत. 'शंकररावांना मी पाहिलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री मानतों', असे त्यांनी नमूद केले आहे. शंकररावांनी पक्ष वाढीसाठी आपल्या पदाचा वापर कधीच केला नाही, हे निरीक्षण सप्तर्षी यांनी पाच वर्षांपूर्वीच नोंदविले होते. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात पदाचा वापर करून फोडाफोडीचे जे राजकारण सुरू आहे, ते पाहिल्यानंतर सप्तर्षी यांची राजकीय दूरदृष्टी अधोरेखित होते.

'यूक्रांद' आणि इतर चळवळी-उपक्रमांच्या निमित्ताने सप्तर्षी यांचा नांदेड शहर आणि जिल्ह्याशी खूप जवळून संबंध आला. या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांपासून अनेक दिग्गजांपर्यंत सान्यांशी त्यांचा संवाद आणि संपर्क होता, ही बाब नवीन नाही; पण महाराष्ट्राच्या राजकारणात 'हेडमास्तर' हे संबोधन लागलेले माजी मुख्यमंत्री शंकरराव बव्हाण १९७८ साली साधे आमदार असताना विधिमंडळातील कामकाजातल्या वेगवेगळ्या बाबी, तसेच त्यांतील बारकावे समजून घेण्यासाठी सप्तर्षी हे त्यांचे विद्यार्थी बनले होते. तेव्हाची ही आठवण सप्तर्षी यांनी आपल्या 'व्याक्तिरंग' या पुस्तकात नोंदविली आहे.

वरील पुस्तकात सप्तर्षी यांनी आपल्या श्रद्धास्थानांसोबतच शंकररावांवरील एक सविस्तर लेख सामाविष्ट केला आहे. सप्तर्षी १९७८ साली प्रथमच आमदार झाले होते. विधानसभेतील आपली कामगिरी प्रभावी आणि परिणामकारक व्हावी, यासाठी तेव्हा अनुभवसमृद्ध असलेल्या शंकररावांकडून त्यांनी काही काळ आमदार निवासातल्या खोलीमध्ये बसून मार्गदर्शनपर धडे घेतले होते. त्याला त्यांनी 'शिकवणी' असे म्हटले आहे.

तेव्हा विधानसभेत गाजलेल्या एका प्रकरणात सप्तर्षी यांना या शिकवणीचा चांगलाच उपयोग झाला. त्यानंतर शंकररावांनी त्यांना उत्तीर्ण ठरवत शिकवणी वर्ग थांबविला. या शिकवणीच्या निमित्ताने शंकररावांशी झालेली जवळीक शेवटपर्यंत कायम राहिली, असे त्यांनी नमूद केले आहे.

सप्तषी यांचा नांदेडमधील जुन्या आणि नव्या पिढीतील नेते-कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मंडळींशी निकटचा संबंध आला. मागील शतकाच्या उत्तरार्धात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने ते अनेकदा नांदेडला आले. नांदेडच्या प्रसा वैद्यकीय प्रतिष्ठानचा पद्मिनीबाई बन साधन सन्मान त्यांनी स्वीकारला होता. २०२३ साल हा सन्मान स्वीकारून या समाजवा विचारवंताने आमच्या पुरस्काराची प्रतिष्व वाढविली, अशी भावना या पुरस्कारा संयोजक डॉ. अच्युत बन यांनी येथे व्यक केली.

२००५ साली नांदेडमध्ये 'एक जिल्हाधिकाऱ्यांस निरोप आणि नव्ह जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत' असा संयुक्त जाहीर कार्यक्रम आयोजित केला गेला होत त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असले सप्तर्षी यांचे भाषण शासन-प्रशासनातल्य बारकाव्यांचे त्यांचे आकलन ठळक करण होते. त्यांच्या 'सत्याग्रही विचारधारा' क मासिकाचा नांदेडमध्ये मोठा वावकवर्ग होत सप्तर्षी यांचा थेट परिचय असले नांदेडमधील अनेक जुने नेते आता हया नाहीत; पण नव्या पिढीतील कार्यकर्त्यांश त्यांचा नित्य संपर्क होता.

Shankarrao Chavan legacy
Latur traffic enforcement : हेल्मेट, सीट बेल्टविना वाहन चालविणाऱ्या २६२ चालकांवर कारवाई
  • डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या 'व्यक्तिरंग' पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांसह शंकरराव चव्हाण आणि शरद पवार यांच्यावरचे लेख समाविष्ट आहेत. 'शंकररावांना मी पाहिलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री मानतों', असे त्यांनी नमूद केले आहे. शंकररावांनी पक्ष वाढीसाठी आपल्या पदाचा वापर कधीच केला नाही, हे निरीक्षण सप्तर्षी यांनी पाच वर्षांपूर्वीच नोंदविले होते. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात पदाचा वापर करून फोडाफोडीचे जे राजकारण सुरू आहे, ते पाहिल्यानंतर सप्तर्षी यांची राजकीय दूरदृष्टी अधोरेखित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news