Cold Wave : नांदेड जिल्ह्यामध्ये थंडीची तीव्र लाट
Severe cold wave in Nanded district
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून सकाळी तापमानात लक्षणीय घट जाणवत आहे. पहाटेच्या सुमारास शहर व परिसरात दाट धुक्याचं प्रमाणही वाढलं आहे. याच थंडीच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी टिपलेलं एक सकाळचं दृश्य विशेष लक्ष वेधून घेत आहे.
छायाचित्रात रस्त्याच्या कडेवर शाल गुंडाळून उभा असलेला एक व्यक्ती, पार्श्वभूमीला धुक्यात लपलेली शाळेची बस आणि सूर्योदयाची केशरी लाली यामुळे कडाक्याची थंडी स्पष्ट जाणवते. परिसरातल्या लोकांना पहाटे घराबाहेर पडताना मोठ्या प्रमाणात उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील ४८ तासांमध्ये मराठवाड्यातील नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी सकाळ-संध्याकाळच्या वेळी उबदार कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

