

Umri Kharidi Vikri Sangh
उमरी : उमरी खरेदी विक्री संघाची निवडणूक जाहीर झाली होती. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख नऊ डिसेंबर होती. परंतु अचानक या निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. ही निवडणूक प्रक्रिया जैसे थे ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर उमरी खरेदी विक्री संघाची निवडणूक होईल, असे खरेदी विक्री संघातील प्रकाश तुमकुंटे यांनी सांगितले.
उमरी नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. त्या दृष्टीकोनातून 13 जागांसाठी जवळपास 46 जणांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची होणार होती. परंतु या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे सर्व प्रक्रिया जैसे थे ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर ही निवडणूक होणार आहे.