

Sena's protest successful, traffic on Nanded-Nagpur highway halted for some time
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शेतक-यांचा सातबारा कोरा करावा, बेमोसमी पावसामुळे झालेल्या बागायतदारांना सत्वर मदत करावी या व अन्य मागण्यांसाठी शिवसेनेच्या (उबाठा) गटाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येईल, लाडकी बहीण बोजनेंतर्गत २१०० रुपये दिले जातील, पाणंद रस्ते मोकळे केले जातील, खतावरील जीएसटी अनुदानाच्या स्वरूपात परत करण्यात येईल, शेतमालाला हमीभाव देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही.
शेतकरी व सर्व सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नासंदर्भात शिवसेनेच्या (उबाठा) गट वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मराठवाडघातल्या वेगवेगळ्या भागात ही आंदोलने सुरू आहेत. आज शिवसैनिकांनी नदिड नागपूर महामार्गाबर असलेल्या पिंपळगाव येथे चकाजाम आंदोलन केले.
सकाळी ११ वाजताच वेगवेगळ्या ग्रामीण भागातून आलेले शिवसैनिक तेथे जमले. जिल्हाप्रमुख बबन बारसे, भुजंग पाटील, ज्योतिबा खराटे यांच्या नेतृत्वाखालील रास्ता रोको आंदोलन करताना शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात क्या हुआ तेरा वादा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
आजचे आंदोलन हे लोकशाही पद्धतीने करण्यात आले आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी, शिवाय सोमवारी झालेल्या अतिवृष्टीने अर्धापूर, मुदखेड, बारड, भोकर या भागातील केळी पिकांचे व अन्य बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, वादळी बाच्यासह इझालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३ लाख हेक्टरी मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.