Rayalaseema Express : रॉयलसीमा एक्स्प्रेस नांदेडपर्यंत कधी धावणार?

नवीन एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना उमरीत थांबा नसल्याने प्रवाशांची अडचण
Rayalaseema Express
Rayalaseema Express : रॉयलसीमा एक्स्प्रेस नांदेडपर्यंत कधी धावणार?File Photo
Published on
Updated on

When will Royal Seema Express run to Nanded?

उमरी, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र आणि तेलंगाणाच्या सीमेवर असलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्रामात मोठे योगदान असलेल्या उमरी येथील रेल्-वेस्थानकावर नवीन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात आला नसल्याने या भागातील प्रवाशांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते.

Rayalaseema Express
Nanded News: भारीच! गोवा-नांदेड-बंगळुरू विमान मार्गाने जोडणार, या एअरलाईन्सने दिला प्रस्ताव

विशेष म्हणजे निजामाबाद येथून तिरुपतीकडे जाणारी आणि तिरुपती येथून निजामाबादकडे येणारी रॉयलसीमा एक्स्प्रेस नांदेडपर्यंत कधी धावणार या बाबतीत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रेल्वे प्रश्नाच्या संदर्भात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

उमरी हे तालुक्याचे ठिकाण असून मराठवाडा मुक्तिसंग्रामात बँक लुटीच्या प्रकरणाने क्रांतिकांराची उमरी म्हणून इतिहासात उमरीचे नाव कोरले आहे. परंतु, उमरी रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागण्या प्रलंबित आहेत.

Rayalaseema Express
Ganeshotsav 2025 : 'छावा स्टाईल' श्री मूर्ती यंदाचे आकर्षण !

नांदेड येथून हैदराबादकडे जाणाऱ्या कर्नल एक्स्प्रेस, विशाखापटनम एक्स्प्रेस, अमरावती तिरुपती एक-स्प्रेस, ओखा रामेश्वर एक्स्प्रेस, नगरसोल नरसापूर एक्स्प्रेस, यशवंतपुर एक्स्प्रेस, चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस, शिर्डी तिरुपती एक्स्प्रेस, जयपूर अजमेर एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांना रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा यासाठीची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे तिरुपती ते निजामाबादपर्यंत धावणारी रॉयलसीमा एक्स्प्रेस नांदेडला येण्याचे स्वप्न गेल्या तीन वर्षांपासून स्वप्नच राहीले आहे.

यासंदर्भात मागील काही लोकप्रतिनिधी रॉयलसीमा एक्स्प्रेस नांदेडपर्यंत लवकरच धावेल या बाबतीत आश्वासन दिले होते. परंतु त्यांच्या आश्वासनाची अद्यापपर्यंत पूर्तता झालीच नाही.

या भागातील रेल्वे प्रश्न प्रलंबित आहेत. नवीन रेल्वे गाड्यांना उमरीत थांबा मिळण्यासंदर्भात अनेक वेळा निवेदने देण्यात आली. रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून मागणी करण्यात आली परंतु त्या मागणीची अद्यापपर्यंत पूर्तता झालीच नाही.

रेल्वे गाड्यातील अनेक प्रश्न ऐरणीवर असल्याने रेल्वे प्रवाशांच्या समस्या वाढल्या आहेत. रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिस चौकी आहे. परंतु ती अत्यंत दुर्लक्षित आहे. पावसाळ्यात रेल्वे चौकीत साप, विंचू निघतात. अशा परिस्थितीत लोकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा जीव धोक्यात आला आहे.

youtube.com/watch?v=gA4rAOWwyUc

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news