Rare Monitor Lizard | हिमायतनगरात दुर्मिळ घोरपडीचे दर्शन; वनविभागाच्या तत्परतेने जीव वाचला

पळसपूर रोड परिसरातील शेतात दुर्मिळ घोरपड आढळून आल्याने काही काळ नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण
Rare Monitor Lizard  Nanded
पळसपूर रोड परिसरातील शेतात दुर्मिळ घोरपड आढळून आल्याने काही काळ नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरणPudhari
Published on
Updated on

Rare Monitor Lizard Nanded

हिमायतनगर : हिमायतनगर शहरालगतच्या पळसपूर रोड परिसरातील शेतात दुर्मिळ घोरपड आढळून आल्याने काही काळ नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले. पत्रकार अनिल मादसवार यांच्या शेतातील खत व बियाणे ठेवलेल्या कोठ्यात दबा धरून बसलेल्या घोरपडीची वनविभागाने तत्परतेने आणि सुरक्षितरीत्या सुटका करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडले.

अलीकडील पावसामुळे शेतातील बिळे पाण्याने भरल्याने अनेक सरपटणारे प्राणी सुरक्षित आश्रयाच्या शोधात शेतातील कोठारे, आखाडे आणि इतर ठिकाणी येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना अधिक दक्षता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Rare Monitor Lizard  Nanded
Nanded News : टीईटी घोटाळ्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

सोमवारी सकाळी गट क्रमांक ३ मधील शेतात पेरणीपूर्व तयारी सुरू असताना खत व बियाणे काढण्यासाठी कोठार उघडले असता आत दुर्मिळ घोरपड आढळली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पत्रकार अनिल मादसवार यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला.

माहिती मिळताच वनपाल ज्ञानेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनमजूर शेख अहमद व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणतीही इजा न होता अत्यंत शिताफीने घोरपड पकडून सुरक्षितपणे वनक्षेत्रात मुक्त करण्यात आले.

वनविभागाच्या माहितीनुसार, ही घोरपड विटकरी-काळ्या पट्टेदार रंगाची असून तिची लांबी सुमारे दीड फूट, रुंदी तीन इंच आणि वजन अंदाजे पाऊण ते एक किलो आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, घोरपड हा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त वन्यजीव असून ती उंदीर, कीटक आणि इतर लहान जीवांवर नियंत्रण ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावते.

Rare Monitor Lizard  Nanded
Nanded News : महिलांनी केली बंधाऱ्याची दुरुस्ती; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष !

वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, घोरपड किंवा इतर कोणताही वन्यजीव आढळल्यास त्याला इजा न करता त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा. या घटनेत वनविभागाने दाखविलेल्या तत्परतेचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले असून वन्यजीव संवर्धनासाठी प्रत्येकाने अशीच जागरूकता दाखवावी, असे मत व्यक्त करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news