Nanded News : टीईटी घोटाळ्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

'नीट' पाठोपाठ रविवारी होणारी शिक्षक भरती परीक्षेचा 'टीईटी'चा पेपरदेखील फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
Nanded News
Nanded News : टीईटी घोटाळ्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलनfile photo
Published on
Updated on

Congress protest against the TET scam

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : 'नीट' पाठोपाठ रविवारी होणारी शिक्षक भरती परीक्षेचा 'टीईटी'चा पेपरदेखील फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ खा. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांच्या नेतृत्वात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (दि. २७) आयटीआय चौक येथे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

Nanded News
Nanded News : एसआयआर मोहिमेत गांभीर्याने सहभागी व्हावे : खा. चव्हाण

नीट' पाठोपाठ 'टीईटी'चा पेपर फुटल्याने वारंवार होणाऱ्या पेपरफुटीतून सरकारचे अपयश अधोरेखित होत आहे. यातून परीक्षार्थीचे वर्ष किंबहुना आयुष्य बरबाद होत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांनी केला. या वेळी सरकारच्या विरोधात बोंबा मारून तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

Nanded News
District Bank Election : आ. दानवे महायुतीच्या छावणीत

या वेळी डॉ. श्रावण रॅपनवाड, सुरेंद्र घोडजकर, नगरसेवक मुन्ना अब्बास, सत्यपाल सावंत, नागराज सुलगेकर, कुमार कुर्तडीकर, सुरेश हाटकर, गगन यादव, शंकर शिंदे, बापूसाहेब पाटील, संजय वाघमारे, अक्षय नळगे, गणेश कोकाटे, सजेतसिंग ढिल्ले, प्रवीण कानघुले, अमरजितसिंग बुटर, रवी कल्याणकर, ज्योती कदम, जेशिका शिंदे, सुरेखा वैद्य, किरण पडलवार, तुषार देशमुख, अझहर शेख, प्रसेनजित वाघमारे, सचिन टाले, गजानन जाधव, प्रकाश दिपके, प्रबुद्ध चित्ते, संजय कोठेकर, कलीम शेख, गौतम सिरसाट, शेख नईम आदींसह इतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news