Nanded News : रेल्वेची कारवाई; प्रवाशांकडून अडीच लाखांचा दंड वसूल

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला चाप लावण्यासाठी सोमवारी (दि. २०) विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली.
Nanded News
Nanded News : रेल्वेची कारवाई; प्रवाशांकडून अडीच लाखांचा दंड वसूलfile photo
Published on
Updated on

Railway action; ₹2.5 lakh fine collected from passengers

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला चाप लावण्यासाठी सोमवारी (दि. २०) विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तब्बल ५१९ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करत रेल्वे प्रशासनाने २ लाख ५३ हजार १०५ रुपयांचा महसूल वसूल केला.

Nanded News
Nanded News : एकाच दिवसात ५६ गुन्हे दाखल, ७९ जण जाळ्यात; पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

या मोहिमेत ३१ तिकीट तपासनीसांच्या (टीटीई) पथकाने सचखंड, देवगिरी, नंदीग्राम, तपोवन, पनवेल यासह प्रमुख २७रेल्वे गाड्यांची सखोल तपासणी केली. यात विनातिकीट प्रवासाच्या २८५ प्रकरणांतून २ लाख २ हजार ८६५ रुपये, तर अनियमित प्रवासाच्या १७प्रकरणांतून ११ हजार ७९० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच विनाबुकिंग सामानाची २१७ प्रकरणे आढळल्याने ३८ हजार १०५ रुपयांचा दंड आकारण्यात आला.

Nanded News
Nanded News : 'युवा कट्टा'मध्ये विद्यार्थ्यांनी मांडले परखड विचार

रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी आणि गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी नेहमी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन नांदेड विभागाकडून करण्यात आले आहे. आगामी काळातही अशा धडक कारवाया सुरूच राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news