Nanded Crime News : पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनीने वसतिगृहात जीवन संपवले

शहरातील विष्णुपुरी परिसरातील ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा वसतिगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
nanded crime news
पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनीने वसतिगृहात जीवन संपवलेfile photo
Published on
Updated on

Polytechnic Student Ends Her Life in Hostel

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: शहरातील विष्णुपुरी परिसरातील ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा वसतिगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी घटना घडली. सानिका खांडरे असे मृत तरुणीचे नाव असून ती हिमायतनगर तालुक्यातील वाघी येथील रहिवासी होती.

nanded crime news
Nanded crime : जीवन घोगरे पाटलांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

सानिका ही ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक अॅण्ड टेलीकम्युनिकेश शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे तिचा भाऊ देखील त्याच वर्गात शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. महाविद्यालयात सध्या अंतर्गत परीक्षा सुरू आहेत.

बुधवारी सकाळी ८ ते ९.३० या वेळेत सानिकाचा पेपर होता. पेपर पूर्ण केल्यानंतर ती हॉस्टेलच्या मैत्रिणीसोबत वसतिगृहात गेली. आपल्या काकांना फोन करून पेपर चांगला गेला, अशी माहिती दिली होती.

nanded crime news
Electric Shock : चिंचा घेण्यासाठी झाडावर चढणे बेतले जीवावर

त्यानंतर ती रूममधील मैत्रिणीसोबत काही वेळ फिरायला गेली. थोड्या वेळानंतर मैत्रीण जेवण करण्यासाठी गेली. आणि काही वेळाने परत आल्यानंतर सानिकाचा मृतदेह वसतिगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news