Umarkhed Municipal Council | उमरखेड नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यांना अपात्र करा: नागपूर खंडपीठात याचिका दाखल

दोन सदस्यांच्या नियुक्तीवर गंभीर आक्षेप
Nagpur High Court bench
Nagpur High Court benchPudhari File Photo
Published on
Updated on

Umarkhed municipal council news

उमरखेड : उमरखेड नगर परिषदेतील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. दोन सदस्यांच्या नियुक्तीवर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

याचिकाकर्ते बाळासाहेब ऊर्फ सिद्धार्थ यशवंत धोंगडे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेत नगर परिषदेत नामनिर्देशित सदस्य म्हणून करण्यात आलेल्या दोन नियुक्त्या नियमबाह्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Nagpur High Court bench
Umarkhed gulmohar bloom : रखरखत्या उन्हात लाल ज्वालेसारखा बहरला गुलमोहर!

माहितीनुसार, २१ डिसेंबर २०२५ रोजी उमरखेड नगर परिषदेची निवडणूक पार पडली होती. त्यानंतर महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अविनाश उर्फ गोपाल अग्रवाल, बाळासाहेब नाईक आणि विजय गुजरे यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, यापैकी दोन सदस्यांकडे आवश्यक प्रशासकीय अनुभव किंवा पात्रता नसतानाही त्यांची निवड करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

१६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत संबंधित सदस्यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर २१ जानेवारी २०२६ रोजी राज्य शासनाच्या राजपत्रात नियुक्तीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.

याचिकाकर्त्यांनी न्यायालयात दावा केला आहे की, संबंधित नियुक्त्या करताना नियम ४ मधील अनिवार्य अटींचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Nagpur High Court bench
Umarkhed Municipal Council Election Result 2025 | उमरखेड नगरपरिषदेवर 'जनशक्ती'चा गुलाल! नगराध्यक्षपदी तेजश्री संतोष जैन यांचा दणदणीत विजय

या प्रकरणात राज्य शासन, जिल्हाधिकारी यवतमाळ आणि उमरखेड नगर परिषद यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संबंधित नियुक्त सदस्यांपैकी बाळासाहेब नाईक हे नगराध्यक्ष तेजश्री जैन यांचे पती अॅड. संतोष जैन यांचे निकटवर्तीय मानले जातात, तर गोपाल अग्रवाल हे जनशक्ती पॅनलचे अध्यक्ष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news