‌Nanded News : ‘पीपल्स‌’च्या प्राचार्यपदासाठी सारी यंत्रणा ‌‘अशोक वना‌’त उभी!

एनएसयूआयची विद्यापीठ कुलगुरूंकडे तक्रार
Nanded Education Society appointment issue
‘पीपल्स‌’च्या प्राचार्यपदासाठी सारी यंत्रणा ‌‘अशोक वना‌’त उभी!pudhari photo
Published on
Updated on

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पीपल्स कॉलेजमधील एका सहयोगी प्राध्यापकाच्या गळ्यात प्राचार्यपदाची माळ घालता यावी, यासाठी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कारभाऱ्यांनी विद्यापीठासह सारी यंत्रणा ‌‘अशोक वना‌’त उभी केली असल्याचे समोर आले आहे. या महाविद्यालयाच्या वर्तुळात त्यावर चर्चा सुरू झाली आहे.

वरील संस्थेतील हे अंतर्गत प्रकरण बाहेर येण्याचे कारण घडले ते एनएसयूआयचे प्रदेश सरचिटणीस गोविंद पाटील यांनी मंगळवारी स्वाराती मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिलेले एक निवेदन. या निवेदनात त्यांनी ‌‘पीपल्स‌’च्या प्राचार्यपदाच्या जाहिरातीस मंजुरी देण्यासाठी विद्यापीठात झालेल्या घडामोडी आणि त्यामागचे ‌‘अर्थपूर्ण‌’ व्यवहार याची निःपक्षपातीपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी करतानाच प्र-कुलगुरू अशोक महाजन यांच्या गैरकारभाराकडे कुलगुरूंचे लक्ष वेधले.

Nanded Education Society appointment issue
Nanded ITI new hostel : नांदेड आयटीआयसाठी 300 विद्यार्थी क्षमतेचे नवीन वसतिगृह मंजूर

‌‘पीपल्स‌’चे प्राचार्यपद मागील सहा महिन्यांपासून रिक्त आहे. प्रभारी प्राचार्यपदाची जबाबदारी एक अनुभवी व ज्येष्ठ प्राध्यापक सांभाळत आहेत; पण येत्या 31 मार्च रोजी याच महाविद्यालयातून निवृत्त होणाऱ्या एका सहयोगी प्राध्यापकाच्या डोक्यावर प्राचार्यपदाचा मुकुट चढविण्याचा विडा संस्थेच्या ‌‘उद्धटप्रवीण‌’ पदाधिकाऱ्याने उचलला असल्याचे सांगितले जात असून 31 मार्चपूर्वी प्राचार्यपदाची निवड प्रक्रिया पूर्ण करता यावी, अशी नेपथ्यरचना संबंधितांनी केली असल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार प्राचार्यपदाच्या जाहिरातीच्या मसुद्याला 28 फेब्रुवारी रोजी मान्यता मिळाल्यानंतर ‌‘अराखीव‌’ असलेल्या या पदासाठी दोन वृत्तपत्रांमध्ये 2 मार्च रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली. ‌‘विद्यापीठ न्यूज‌’मध्ये जाहिरात प्रकाशित करणे अनिवार्य असल्यामुळे तेथे पाठविण्यात आलेली जाहिरात 9 मार्च रोजी प्रसिद्ध झाली.

अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदत असल्यामुळे महाविद्यालय प्रशासनाला आता 24 मार्चपर्यंत येणारे अर्ज ग्राह्य धरावे लागणार आहेत. प्राचार्यपदासाठी प्रबळ दावेदार झालेले सहयोगी प्राध्यापक 31 मार्च रोजी निवृत्त होणार असले, तरी 24 मार्च ते 30 मार्च या कालावधीत पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने वेगवान हालचाली सुरू असल्याचे पाहून महाविद्यालयाशी संबंधित आचंबित झाल्याचे बघायला मिळाले.

Nanded Education Society appointment issue
Cooperative bank regulation : दहा वर्षे पूर्ण झालेल्या बँक संचालकांना ‌‘निवृत्तीचे नारळ!‌’

स्वाराती विद्यापीठ कार्यक्षेत्रात यापूर्वी कुठल्याही महाविद्यालयांमध्ये प्राचार्यपदाच्या बाबतीत एवढ्या गतिमानतेने प्रक्रिया पूर्ण झाल्याचे ऐकिवात नाही. पण पीपल्समध्ये ‌‘अशोक पर्व‌’ आणण्यासाठी भलतेच खटाटोप सुरू आहेत. संबंधित सहयोगी प्राध्यापकाने आपले जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया जानेवारी महिन्यात सुरू केली. अवघ्या काही दिवसांत त्यांना हे प्रमाणपत्र मिळाल्याचे सांगितले जात आहे.

प्राचार्यपदासाठी इच्छुक असलेल्या एका प्राध्यापकाने संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याची भेट घेतली तेव्हा या पदाधिकाऱ्याने संस्था कोणाची निवड करणार, ते स्पष्टपणे सांगितल्याचे कळते. देदीप्यमान परंपरा असलेल्या या महाविद्यालयात प्राचार्यपदासाठी चाललेल्या हालचाली संस्थेच्या वर्तुळात चर्चेचा विषय बनल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news