Nanded ITI new hostel : नांदेड आयटीआयसाठी 300 विद्यार्थी क्षमतेचे नवीन वसतिगृह मंजूर

खासदार रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
Nanded ITI new hostel
नांदेड आयटीआयसाठी 300 विद्यार्थी क्षमतेचे नवीन वसतिगृह मंजूरpudhari photo
Published on
Updated on

नांदेड : शहरातील श्री गुरू गोविंद सिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्याथ्यांच्या निवासाचा अनेक वर्षांपासून रखडलेलला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी राज्य शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संस्थेच्या आवारात 300 विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे नवीन वसतिगृह बांधण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाने 17 कोटी 94 लाख 54 हजार 112 रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे.

नांदेड येथील आयटीआयचे जुने वसतिगृह अत्यंत जीर्ण झाल्याने आणि राहण्यायोग्य नसल्याने अनेक वर्षांपासून बंद होते. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून तांत्रिक शिक्षणासाठी येणाऱ्या गोरगरीब, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातोल विद्यार्थ्यांना शहरात महागड्या दराने खासगी खोल्या भाड्याने घेऊन राहावे लागत होते. अनेकदा आर्थिक ओझं सहन न झाल्याने काही विद्याथ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.

Nanded ITI new hostel
Cooperative bank regulation : दहा वर्षे पूर्ण झालेल्या बँक संचालकांना ‌‘निवृत्तीचे नारळ!‌’

ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन खासदार रवीद्र वसंतराव चव्हाण यांनी राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडे या प्रश्नाचा तातडीने निपटारा करण्याची आग्रही मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या शेक्षणिक हितासाठी संस्थेच्या आवारातच सुरक्षित आणि सुसज्ज निवारा असणे आवश्यक असल्याचे त्यांनी शासन दरबारी पटवून दिले. त्यांच्या या पत्राची आणि पाठपुराव्याची दखल घेत विभागाने या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली आहे.

या वसतिगृहासाठी कोटी 94 लाख 54 हजार 112 रुपये मंजूर झाले आहेत.यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यातील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठा आधार मिळणार आहे.

“शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणात निवासाची अडचण येऊ नये, हाच आमचा मुख्य उद्देश होता. या नवीन वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक ताण कमी होईल आणि ते आपल्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील, अशी प्रतिक्रिया खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.

Nanded ITI new hostel
Jalna school staff protest : प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

विद्यार्थी आणि पालकांमधून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. लवकरच या भव्य वसतिगृहाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news