

Old Nanded continues to be under flood siege for the second day
नांदेड, पुढारी वृत्तसेवा जुन्या नांदेड शहराचा आणि गोदावरी नदी काठच्या भागाला दुसऱ्या दिवशीही पुराचा वेडा कायम होता. काही रस्त्यांसह शेकडो घरे पाण्याखाली गेलेली आहेत. दरम्यान, खबरदारी म्हणून या भागातील ४५४ नागरिकांना महापालिकेने तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरित केले आहे.
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे जुन्या नदिडातील अनेक भागासह सैलाव नगर, दुल्हेशाह नगर, खडकपुरा, गाडीपुरा, काला पूल, गौतमनगर, शनि मंदिर, गायत्री मंदिर, पाकिजानगर, बिलालनगर, हिलालनगर, नावघाट, मोमिन पुरा, वसरणीलगतचे पंचवटीनगर, जुन्या पुलालगतच्या देगलूर नाका परिसरात बँक वॉटरचे पाणी शिरल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेकडे घरे, दुकाने पाण्याखाली गेलेली आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपातच तयार केलेल्या १० निवारा केंद्रामध्ये पुरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतरी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यात झोन क्रं. चार (नंदगिरी किल्ला) येथे २८, गांधी राष्ट्रीय विद्यालय गाडीपुरा-४५, जमजम फंक्शन हॉल वाधी रोड १५०, मार्कंडेय मंदिर ३६, खैरूल उल्लम स्कूल खडकपुरा-५०, लिवटी फंक्शन हॉल-४५, पाकीजा फंक्शन हाल ५०, जिल्हा परिषद शाळा वसरणी ५० अशा प्रकारे ४५४ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आल्याचे मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जीवितहानीही झाली, ही बाब दुःखद असून सरकारने बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण मदत करावी, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी केली आहे.
मराठवाडा आणि राज्यातील एकंदर वर्तमान समजल्यानंतर गांधी यांनी आपली भावना फेसबूक पेजच्या माध्यमातून व्यक्त केली. अशा प्रसंगात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनास सहकार्य करावे तसेच गरजूंना आवश्यक ती मदत करावी, असे आवाहन त्यांनी गुरुवारी केले. खा. गांधी यांनी ओल्या दुष्काळाखालील मराठवाड्याचा दौरा करावाच ही विनंती आम्ही त्यांना पुन्हा करणार आहोत, असे देशमुख यांनी सांगितले.
परंडा तालुक्यात भीषण स्थिती परंडचातील वागेगव्हाण, शिराळा व परिसरातील गावे पुराच्या पाण्यात पूर्णपणे झाकोळली गेली आहेत. यामुळे अनेक कुटुंबांचा संसार उद्धस्त झाला असून, शेती पिके, घरे व दुकाने यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व बाधितांना तातडीने मदत मिळण्याची गरज व्यक्त होत आहे.
बापव्हाण येथील सरदकुमार कुलकर्णी यांच्या घरासह त्यांच्या कृषी सेवा केंद्र दुकानातील २० ते २५ लाखांचा माल पाण्यात गेला आहे. केळी बाग, ऊस, इतर पिके वाया गेली असून, विहिरी गाळाने भरल्या आहेत. पुराच्या पहिल्याच रात्री त्यांच्या मुलाला सर्पदंश झाल्याने तो हॉस्पिटलमध्ये दाखल होता. कुटुंबातील सदस्यांना शेजाऱ्यांनी अक्षरशः खांद्यावर घेऊन सुरक्षित स्थळी पोहोचवले. मात्र मदतीचा हात मात्र कुणाकडूनही पोहोचला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
लातूर, पुढारी वृत्तसेवा: मांजरा नदीस आलेल्या पुरात नदीपात्रात असलेल्या सुबाभळीच्या झाडांवर तीन दिवसांपासून अडकलेल्या व उपासमार होत असलेल्या निलंगा तालुक्यातील चिचोडी येथील वानरांना लातूर येथील आपत्ती निवारण कक्षाच्या शोध व बचाव पथकाने केळी व बिस्किटे देऊन भूतदयेचे अनोखे दर्शन घडवले. त्यांच्या या वन्यजीव सेवेचे सर्वत्र कौतूक होत आहे.
निलंगा तालुक्यातील चिचोडी येथे मांजरा नदीला पूर आला आहे. दरम्यान नदीपात्रात सुबाभळीची झाडे असून त्यास चहुबाजूंनी पाण्याचा वेढा पडला आहे.
त्यावर सुमारे ८ ते १० वानरे व त्यांची चार पिले असून पुरामुळे ती गेली तीन दिवसांपासून अडकली आहेत. विशेष म्हणजे नदीचे पाणी वाढत असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. त्यांची एकप्रकारे उपासमार होत होती. या वन्यजीवांची सुटका करावी व त्यांना फळे द्यावीत असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. डॉ. साकेब यांनी उदगीरच्या बचाव पथकास एक बोट देऊन घटनास्थळी पाठवले. या पथकात गंगाधर खरोडे, सोमनाथ मादळे, अविनाश फुलारी, नागेश तुरे, उमाकांत गडारे, रत्नजीत पारखे, अरबाज शेख, शिवशंकर रावळे, राजकुमार चामले यांचा समावेश होता.
किडूकमिडूक विकून आलेल्या पैशातून पेरणी केली. अपार मेहनत घेत पिकं जगवली. येणाऱ्या उत्पादनावर पुढचे स्वप्न रंगवत असतांनाच अतिवृष्टीने पिकांचे होत्याचे नव्हते केले आणि स्वप्नांचा बुराडा झाला. बहुतांश जमीन कोरडवाहू असल्याने रब्बी पिकाची आस नाही. सिंचनाच्या गप्पा मारणाऱ्यानी भोकर तालुक्यात सिंचनाची सोय केली नाही. एकीकडे दुर्दैवी नेते आणि दुसरीकडे निसर्गाचा कोप यामुळे आमचे नशिबच फुटके म्हणत भोकर तालुक्यातील शेतकरी नशीबाला दोष देत आहे.