Nanded Temple Theft | इज्जतगावच्या भवानी मंदिरातील दानपेटी फोडली; चार लाखांची रक्कम लंपास?

नवरात्रोत्सवातील दानावर चोरट्यांचा डल्ला; मोजणीत केवळ सव्वा लाख रुपये, उमरी पोलिसांकडून तपास सुरू
Temple Theft
Temple TheftPudhari
Published on: 
Updated on: 

Umri Ijjatgaon Bhavani Temple Theft

उमरी : तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इज्जतगाव येथील प्रसिद्ध भवानी मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे चार लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी झाल्याने दानपेटीत पाच ते सात लाख रुपये जमा होतील, असा मंदिर समितीचा अंदाज होता. मात्र, विजयादशमीच्या दिवशी दानपेटी उघडली असता केवळ एक लाख २५ हजार रुपये मिळाल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर पाहणी केली असता दानपेटी फोडल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी उमरी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

दानपेटीतील रक्कम कमी आढळल्याने संशय

इज्जतगाव येथील भवानी मंदिरात यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नऊ दिवस मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंदिरात २४ तास दर्शनाची व्यवस्था, महाप्रसाद आणि रात्रभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे दानपेटीत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होण्याची अपेक्षा होती.

Temple Theft
Nanded News : किनवट बाजार समितीच्या अविश्वास प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

परंपरेनुसार विजयादशमीच्या रात्री पंचांच्या उपस्थितीत दानपेटी उघडण्यात आली. त्यावेळी त्यात केवळ एक लाख २५ हजार रुपये आढळले. नवरात्रोत्सवातील गर्दी आणि भाविकांनी दिलेले दान लक्षात घेता ही रक्कम अपेक्षेपेक्षा कमी असल्याने मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांना संशय आला.

दानपेटी फोडल्याचे उघड

मंदिर समितीने दानपेटीची बारकाईने पाहणी केली असता ती फोडल्याचे दिसून आले. तसेच दानपेटीतून हात घालून नोटा काढल्याच्या खुणाही आढळल्याचे सांगण्यात आले. या प्रकारात अंदाजे चार लाख रुपये चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमकी किती रक्कम चोरीला गेली, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उमरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी दिली.

Temple Theft
Nanded News : दुष्काळ अन् कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्याने संपवले जीवन

२४ तास मंदिर सुरू असताना चोरी कशी?

नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात भाविकांची वर्दळ, दर्शनासाठी रांगा, महाप्रसाद आणि धार्मिक कार्यक्रम सुरू असताना दानपेटी फोडण्याचा प्रकार घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मंदिर परिसरातील वर्दळ असतानाही चोरट्यांनी हा प्रकार कसा केला, दानपेटीतील रक्कम नेमकी कधी लंपास करण्यात आली आणि या चोरीमागे कोणाचा हात आहे, याबाबत परिसरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

देवीच्या मंदिरातील दानपेटीत चोरी झाल्याचे समोर आल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून आरोपींना अटक करावी आणि चोरीला गेलेली रक्कम हस्तगत करावी, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. आता उमरी पोलिसांच्या तपासातून या चोरीचे गूढ उकलते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news