Nanded Robbery | उमरखेड घरफोडीचा छडा: हैदराबाद येथून दोघांना अटक, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरखेड पोलिसांच्या डिटेक्शन ब्रँच (डीबी) पथकाकडून घरफोडी प्रकरणाचा यशस्वी तपास
Umarkhed Burglary Case
Umarkhed Burglary CasePudhari
Published on
Updated on

Umarkhed Burglary Case

उमरखेड : उमरखेड पोलिसांच्या डिटेक्शन ब्रँच (डीबी) पथकाने घरफोडी प्रकरणाचा यशस्वी तपास करत दोन आरोपींना हैदराबाद (तेलंगणा) येथून अटक केली. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोटारसायकल असा एकूण ७ लाख ३६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वनिता गजानन मोहिते (वय ३०, रा. संत नामदेव नगर, राजापूर टाकळी, ता. उमरखेड) यांनी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी उमरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या बाहेरगावी गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. घरातील कपाटातून १ लाख २० हजार रुपये रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेले होते. चोरीतील दागिन्यांची किंमत सुमारे २ लाख ४२ हजार रुपये होती. या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Umarkhed Burglary Case
Nanded News : नांदेडमधील एकत्रित निविदा प्रक्रियेला हायकोर्टात आव्हान

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड तसेच पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख पोउपनि सागर इंगळे यांनी तपास सुरू केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.

तपासादरम्यान आरोपी घटना घडल्यानंतर फरार झाल्याचे निष्पन्न झाले. सायबर सेल यवतमाळच्या मदतीने मोबाईल लोकेशन व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हैदराबाद येथे असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिस पथकाने हैदराबाद येथे जाऊन मनोहर देवकर चव्हाण (वय ४६, रा. राजापूर टाकळी, ता. उमरखेड) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने एका विधीसंघर्षग्रस्त बालक व सविता उर्फ संगीता लक्ष्मण मोहिते (रा. बडोली, ता. किनवट, जि. नांदेड) हिच्यासह घरफोडी केल्याची कबुली दिली.

Umarkhed Burglary Case
Nanded News ... अखेर प्रशासन कारला गावात दाखल

तपासात चोरीतील काही सोन्याचे दागिने आरोपींनी विक्री केल्याचेही समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच (एमएच-२९-बीए-८९१५) मोटारसायकल असा एकूण ७ लाख ३६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंत्ता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोउपनि सागर इंगळे, सपोनि यशोदा मुनेश्वर, सायबर सेलचे कर्मचारी तसेच उमरखेड पोलिस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास पोउपनि सागर इंगळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news