Nanded Crime : दोन वर्षांच्या चिमुकलीवर ३५ वर्षांच्या व्यक्तीकडून अत्याचार

नांदेड जिल्ह्यातील सोनखेड येथील घटना
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

नांदेड : सोनखेड (जि. नांदेड) पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका दोन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय नराधमाला नांदेड पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले. विलास पंडित वाघमारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो परभणी जिल्ह्यातील पालम येथील वन विभागाच्या हद्दीत लपून बसला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या दोन वर्षांच्या चिमुरडीवर विलास वाघमारे याने चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केला. ही संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने तत्काळ सोनखेड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

Crime News
Illegal Sand Mining : सेनगाव पोलिसांची रेती माफियांविरुद्ध कारवाई

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तांत्रिक माहिती व डेटा विश्लेषणाचा प्रभावी वापर करण्यात आला. गुन्हा घडल्यानंतर आरोपी परभणी जिल्ह्याच्या दिशेने पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस करून तो पालम येथील जंगलात दडून बसल्याचे शोधून काढले आणि तातडीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे करत आहेत.

कठोर कलमांखाली गुन्हे दाखल

नांदेड पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दिवस मावळण्यापूर्वीच आरोपीचा माग काढला. आरोपी विलास वाघमारे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ६४(२) (एफ) व ६५ (२), तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ च्या कलम ४, ५ (म), ५ (न) आणि ६ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar Crime : नशेची तलफ भागवण्यासाठी दुचाकी चोरी ; सराईत गुन्हे शाखेच्या जाळ्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news