Nanded Crime : कर्ज फेडण्यासाठी वापरला विम्याचा फंडा

मालकानेच विकला स्वतःचा ट्रक; फसवणुकीचा गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

​नांदेड :ट्रकचे हप्ते थकीत असल्याने आणि विम्याचे पैसे उकळण्याच्या उद्देशाने स्वतःचाच १६ लाख रुपयांचा ट्रक परस्पर विकून चोरीचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या एका टोळीचा नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मूळ तक्रारदार तथा ट्रकमालकासह तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून २ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी उस्माननगर पोलीस ठाण्यात फिर्यादी विजयकुमार गणपती कल्लाळे (रा. बामणी, ता. कंधार) याने तक्रार दिली होती. कलंबर फाटा येथील घरासमोर उभा असलेला त्याचा १६ लाख रुपये किमतीचा टाटा १४ टायरी जुना ट्रक (क्र. MH ३८ X ११२१) चालक बालाजी विनायक घोगरे याने परस्पर चोरून नेल्याचे त्याने नमूद केले होते. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Crime News
Sambhajinagar Illegal Sand Transportation : ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या थेट अंगावर हायवा घालण्याचा प्रयत्न

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले व त्यांचे पथक या गुन्ह्याचा तपास करत होते. दरम्यान, संशयित चालक बालाजी घोगरे हा विष्णुपूरी दवाखाना परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने साथीदार माधव घोगरे आणि स्वतः तक्रारदार असणाऱ्या ट्रकमालक विजयकुमार कल्लाळे यांच्यासोबत मिळून हा कट रचल्याची कबुली दिली.

या यशस्वी कारवाईत पोलिसांनी तिन्ही आरोपींना (विजयकुमार कल्लाळे, बालाजी घोगरे, माधव घोगरे) पुढील कायदेशीर कारवाईसाठी उस्माननगर पोलिसांच्या स्वाधीन केले असून, आरोपी बालाजीकडून २ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी करत आहेत.​

Crime News
Dawargaon Devi Jagdamba Mata Temple : डावरगाव येथील नवसाला पावणारी जगदंबा माता

विम्यासाठी बनाव

तपासात उघड झाले की, ट्रकचे तीन महिन्यांचे हप्ते थकल्याने आणि पैशांची चणचण असल्याने मालक विजयकुमारने चालक बालाजीमार्फत एका इसमास तो ट्रक साडेसात लाख रुपयांत विकून टाकला होता. तसेच, परस्पर गाडी विकून इन्शुरन्सचे पैसे उकळण्यासाठी व एका जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी चालकावरच चोरीची खोटी फिर्याद दाखल केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news