

नांदेड ः श्री हजुर साहिब रेल्वे स्टेशन नांदेड ते टनकपूरसाठी (उत्तराखंड) नवीन रेल्ट्रेवे सुरू झाली असून, ती दर रविवारी नांदेड स्थानकावरून रात्री 11.40 तर टनकपूर येथून दर मंगळवारी सकाळी 5.55 वाजता सुटणर आहे.
रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ बिट्टू यांच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार, पर्यावरण आणि केंद्रीय मंत्री मनजिंदर सिंघ जी सिरस्त्र, राज्यसभेचे माजी सदस्य आणि अल्पसंख्याक समितीचे माजी अध्यक्ष त्रिलोचन सिंघ यांच्यासमवेत बैठक झाली. त्यामध्ये तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब नांदेड देशाच्या विविध भागांशी जोडण्याच्या कल्पनेवर लक्ष केंद्रित करून नांदेड ते टनकपूर रेल्वे साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, ती दर रविवारी नांदेडहून तर दर बुधवारी टनकपूर येथून सुटणार आहे.
नांदेड स्थानकावरून रेल्वे (क्रमांक 17631) दर रविवारी रात्री 11.40 वाजता सुटून पूर्णा जंक्शन, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला जंक्शन, मलकापूर, खंडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, राणी कमलापती, बिना जंक्शन, ललितपूर, झाशी जंक्शन, ग्वाल्हेर जंक्शन, धोलपूर जंक्शन, आगरा कॅन्ट, मथुरा जंक्शन, कासगंज जंक्शन, बदायूं, बरेली जंक्शन, इज्जतनगर, पिलीभीत जंक्शन मार्गे 30 तासांचा प्रवास पूर्ण करून मंगळवारी सकाळी 05:55 वाजता टनकपूर येथे पोहचेल.
तसेच टनकपूर येथून रेल्वे क्रमांक 17632 दर मंगळवारी सायंकाळी सकाळी 9 वाजता सुटणार असून, आलेल्या मार्गानेच नांदेड येथे पोहचेल. या गाडीमुळे श्री हजूर साहिबच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा तसेच श्री हजूर साहिबहून श्री हेमकुंट साहिबला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ होईल.