Nanded rajgad nagar tragedy| मुलीने जीवन संपवल्यानंतर आईचाही विषप्राशनाचा प्रयत्न; राजगड नगर हादरले!

Nanded rajgad nagar tragedy| मुलीने जीवन संपवल्यानंतर आईचाही विषप्राशनाचा प्रयत्न; राजगड नगर हादरले!
 Crime
Crimepudhari photo
Published on: 
Updated on: 

नायगाव : मुलीच्या दुर्दैवी मृत्यूने एका आईच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईने विषप्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना नायगाव तालुक्यातील राजगड नगर येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मायलेकींच्या दुर्दैवी प्रसंगाने नागरिक सुन्न झाले आहेत.

राजगड नगर येथील १६ वर्षीय मुलीने घरात असताना गळफास घेऊन आपले जीवन संपवले होते. घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच तिची आई रुक्मिणी शंकर गजलवाड (वय ६४) यांनी तीव्र मानसिक धक्क्यातून विषप्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.

मुलीच्या मृत्यूने आधीच शोकाकुल झालेल्या कुटुंबात आईच्या विषप्राशनाच्या घटनेने आणखी दुःखाची भर पडली. रुक्मिणीबाईंची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कुंटूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केला पंचनामा

घटनेची माहिती मिळताच कुंटूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जमादार मोहन कांबळे आणि उपनिरीक्षक सुरेश लोणीकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दोन्ही घटनांबाबत पोलिसांनी नोंद घेतली असून, मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

 Crime
Nanded Unique Engagement Ceremony : चक्क स्मशानभूमीत रंगला साक्षगंध ! अनोख्या सोहळ्याची सर्वत्र चर्चा

जीवन संपवल्याने कारण अद्याप अस्पष्ट

मुलीने आपले जीवन का संपवले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मायलेकींच्या दुर्दैवी घटनेमागील कारणांचा शोध कुंटूर पोलिसांकडून घेतला जात आहे. एका तरुण मुलीच्या आयुष्याचा अकाली अंत आणि त्यानंतर आईनेही जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याने राजगड नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

 Crime
Ganja Seized Nanded | कहाळा येथे गांजा विक्रीवर कुंटूर पोलिसांचा छापा; तरुणाला अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.