पळसगाव येथील शेतकरी पत्रकार अरविंद शिंदे यांच्या शेतात आज ही पाणीच पाणी असून त्यांची चार एकर जमीन पूर्णतः पाण्याखाली गेली आहे, बंधारा जुना तसाच ठेवल्याने तेथे लाकूड व पुरसन अडकून पाणी शेतात घुसले व प्रचंड नुकसान झाले असून शिंदे व त्यांच्या शेजारचे सर्व शेतकरी या मुळे हवालदिल झाले आहेत. निर्दयी प्रशासन काहीच हालचाल करताना दिसत नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बाळासाहेब पांडे
नायगाव तालुका - अतिवृष्टी होऊन चार दिवस उलटून गेले तरीही नायगाव तालुक्यातील टाकळगाव-ताकबीड या मुख्य रस्त्यावरील वाहतूक अद्याप बंद आहे. रस्ता खचल्याने परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटलेला असून दळण-वळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी व रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पावसाचे पाणी निचरा न झाल्याने नाले व नालींच्या व्यवस्थेचे अभाव दिसून येत आहे. नाल्याचे संपूर्ण पाणी शेतांमध्ये घुसत असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. पिकांचे प्रचंड नुकसान होत असून शेतमालाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या तक्रारी असूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने जनतेत संताप व्यक्त केला जात आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका देखील या मार्गावरून जाऊ शकत नाही. यामुळे जीव धोक्यात येत आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्ता दुरुस्त करून नाल्यांची योग्य व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
नायगाव तालुक्यातील टाकळगाव-ताकबीड या मुख्य रस्त्यावरील वाहतूक अद्याप बंद आहे. रस्ता खचल्याने परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटलेला असून दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे.