Primary Teachers Stress | प्राथमिक शिक्षकांना रोजच्या कटकटीतून दिलासा: आता ‘माहितीचा वार शनिवार’

शाळा आणि शिक्षकांवरील वाढता प्रशासकीय कामाचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत
Primary Teachers
Primary TeachersAI
Published on
Updated on

Primary Education Directorate

प्रशांत भागवत

उमरखेड : शाळा आणि शिक्षकांवरील वाढता प्रशासकीय कामाचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. ‘माहितीचा वार शनिवार’ या शासन निर्देशाची शाळास्तरावर काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश देण्यात आले असून, अपवादात्मक व अत्यावश्यक बाबी वगळता विविध प्रकारची माहिती दररोज मागविण्याऐवजी ती शनिवारीच मागवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) रमाकांत काठमोरे यांच्या स्वाक्षरीने २१ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि प्रशासन अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. माहिती आयुक्त कार्यालयाच्या १४ जून २०२६ रोजीच्या आदेशाचा संदर्भ देत शालेय स्तरावर मागविण्यात येणारी विविध स्वरूपाची माहिती शनिवारीच सादर करून घ्यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Primary Teachers
Nanded News: नायगावात सरपंचपदाची दुसऱ्यांदा सोडत जाहीर, ४१ गावांत असणार ‘महिलाराज’

शिक्षकांना अध्यापनाच्या नियमित कामासोबत विविध ऑनलाइन माहिती भरणे, अहवाल सादर करणे आणि प्रशासकीय माहिती पाठविण्याची कामे करावी लागतात. अनेकदा वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती दररोज मागविली जात असल्याने शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ प्रशासकीय कामात खर्च होतो. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर माहिती संकलनासाठी ठरावीक दिवस निश्चित करण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

अत्यावश्यक बाबींना अपवाद

‘माहितीचा वार शनिवार’ या निर्देशातून काही अत्यावश्यक बाबींना अपवाद ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती, ‘पीएम पोषण’ योजनेतील आहाराची नोंद, आपत्कालीन स्वरूपाची माहिती तसेच विधिमंडळाशी संबंधित तातडीची माहिती नियमितपणे सादर करावी लागणार आहे. नियमांचे उल्लंघन किंवा अन्य गंभीर बाबींशी संबंधित तातडीची माहिती आवश्यकतेनुसार मागविता येणार आहे.

Primary Teachers
Nanded load shedding : जिल्ह्यात अघोषित भारनियमन !

दैनंदिन माहिती मागविल्याच्या तक्रारी

शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही राज्यातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमध्ये शाळांकडून दररोज वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागविली जात असल्याच्या तक्रारी शिक्षक संघटनांकडून करण्यात आल्या होत्या. शिक्षकांना अध्यापनाच्या वेळेत ऑनलाइन माहिती भरणे आणि अहवाल पाठविण्याची कामे करावी लागत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले होते.

या तक्रारी तसेच माहिती आयुक्त कार्यालयाच्या आदेशाची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने संबंधित अधिकाऱ्यांना या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अनावश्यक दैनंदिन माहिती मागविण्याच्या प्रकाराला आळा बसण्याची अपेक्षा आहे.

Primary Teachers
Nanded Crime News: हैदराबादहून परतलेल्या तरुणाने उमरी रेल्वे स्टेशनजवळ जीवन संपवले, कारण काय?

अध्यापनासाठी मिळणार अधिक वेळ

प्रशासकीय माहिती संकलनाचे काम एका निश्चित दिवशी केल्याने शिक्षकांना नियमित अध्यापनावर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाऊ नये आणि शिक्षकांवरील अनावश्यक प्रशासकीय भार कमी व्हावा, यासाठी २१ सप्टेंबरच्या निर्देशांची शाळास्तरावर काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news