Nanded News : भाजपा कोअर कमिटी बैठकीमध्ये चव्हाण व पदाधिकाऱ्यांत खडाजंगी !

चिखलीकर यांना पुन्हा पक्षात घेतले जाऊ नये, अशी भूमिका चव्हाण यांनी यादरम्यान मांडली.
Nanded News
Nanded News : भाजपा कोअर कमिटी बैठकीमध्ये चव्हाण व पदाधिकाऱ्यांत खडाजंगी !file photo
Published on: 
Updated on: 

Nanded Political News

विशेष प्रतिनिधी

नांदेड : भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीच्या गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरून खासदार अशोक चव्हाण आणि काही पदाधिकाऱ्यांत खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली असून त्यास एका पदाधिकाऱ्याने दुजोरा दिला. चिखलीकर यांना पुन्हा पक्षात घेतले जाऊ नये, अशी भूमिका चव्हाण यांनी यादरम्यान मांडली.

Nanded News
Nanded News : हिवाळी परीक्षेचे शुल्क माफ; स्वारातीम विद्यापीठाचा निर्णय

भाजपाचे प्रदेश महामंत्री तथा मराठवाड्याचे प्रभारी सुनील राणे गेल्या आठवड्यात येथे आले असता नांदेड जिल्हा दक्षिण आणि नांदेड महानगराच्या कोअर कमिटीची बैठक त्यांच्या उपस्थितीत स्वतंत्रपणे भरविण्यात आली. खा. चव्हाण या दोन्ही बैठकांना उपस्थित होते.

नांदेड (दक्षिण) जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत खा. चव्हाण यांनी आपले राजकीय विरोधक चिखलीकर यांच्या लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात आपण संघटनात्मक पातळीवर कमकूवत आहोत, असे राणे यांना सांगितल्यानंतर त्यावर जिल्हाध्यक्ष - हंबर्डे यांनी स्पष्टीकरण दिले. खा. चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपात आलेल्या - प्रमुख कार्यकर्त्यांपैकी चौघांना वरील मतदारसंघात मंडळाध्यक्ष करण्यात आले - आहे. या चौघांचीही चिखलीकरांच्या समर्थकांविरुद्ध निवडून येण्याची क्षमता आहे, असे सांगून त्या मतदारसंघातील अंतर्गत गळती थांबविण्यासाठी चव्हाणांनीच आपले 'फेव्हिकॉल' वापरण्याचा मंत्र हंबर्डे यांनी सांगितला.

नंतर महानगर शाखेच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही आ. चिखलीकरांशी संबंध ठेवण्यावरून दोन प्रदेश पदाधिकाऱ्यांशी चव्हाणांचा खटका उडाला. त्यातील एक पदाधिकारी संजय कौडगे यांच्या घरी चिखलीकर मध्यंतरी गेले होते, याकडे चव्हाण यांनी राणे यांचे लक्ष वेधले असता कौडगे यांनीही चव्हाणांना प्रत्युत्तर दिले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चिखलीकर व त्यांच्या समर्थकांविरुद्ध लढण्याऐवजी तुम्ही त्यांच्याशी युती केली, एका व्यावसायिकाच्या फार्म हाऊसवर तुम्ही त्यांना भेटता, मग ते माझ्या घरी आले तर बिघडले कुठे, असा सवाल कौडगे यांनी केला. या चर्चेत दुसऱ्या एका पदाधिकाऱ्यानेही चिखलीकरांशी युती करण्यावरुन चव्हाणांना जाब विचारला.

वरील चर्चेदरम्यान आ. चिखलीकर पुढील काळात पुन्हा भाजपामध्ये येऊ शकतात, अशी शक्यताही उपस्थित झाली; परंतु आता त्यांना भाजपामध्ये घेऊ नका अशी भूमिका खा. चव्हाण यांनी मांडली. त्यावर सुनील राणे यांनी ही बाब तुमच्या-आमच्या हातात नसल्याची जाणीव त्यांना करून दिली.

Nanded News
Nanded Car Accident | बहादरपुरा पुलावरून कार नदीत कोसळली; पती बचावले, पत्नीचा शोध सुरू

भाजपा प्रदेशाध्यक्षांनी मागील महिन्यात नांदेडमधील तीन संघटनात्मक जिल्ह्यांसाठी पक्षाची कोअर कमिटी जाहीर केली होती. खा. चव्हाण यांना फक्त महानगर जिल्ह्याच्या कोअर कमिटीत स्थान दिले गेले, तर खा. गोपछडे यांना महानगरासोबत नांदेड दक्षिण जिल्ह्याच्या कोअर कमिटीतही घेण्यात आले होते. या कोअर कमिटीत स्थान मिळविण्यासाठी चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षांकडे दाद मागावी लागली. त्यानंतर त्यांचे नाव समाविष्ट केले गेले; पण ही बाब प्रसारमाध्यमांना कळविली गेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news