Nanded News : हिवाळी परीक्षेचे शुल्क माफ; स्वारातीम विद्यापीठाचा निर्णय

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील रहिवासी विद्यार्थ्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने हिवाळी २०२६ परीक्षेसाठी परीक्षा शुल्कातून पूर्णतः सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nanded News
Nanded News : हिवाळी परीक्षेचे शुल्क माफ; स्वारातीम विद्यापीठाचा निर्णयfile photo
Published on: 
Updated on: 

Winter examination fees waived; Swaratim University's decision

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील रहिवासी विद्यार्थ्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने हिवाळी २०२६ परीक्षेसाठी परीक्षा शुल्कातून पूर्णतः सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १४ ऑक्टोबर रोजी राज्यातील कुलगुरूंसमवेत झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Nanded News
Nanded Tulja Bhavani temple Navratri| गडगा येथील तुळजाभवानी देवस्थानात शारदीय नवरात्र महोत्सव, या तारखेला भव्य शिवलग्न सोहळा

त्यानुसार विद्यापीठाच्या सर्व पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नियमित व बॅकलॉग विद्यार्थ्यांसह सर्व शुल्क न घेता स्वीकारण्यात येणार आहेत. एकही विद्यार्थी या शुल्कमाफीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Nanded News
Nanded Rural News : कार्यालयात रिकाम्या खुर्च्या; बाहेर नागरिकांची प्रतीक्षा!

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना ही सवलत लागू राहणार आहे. शासनाने घोषित केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील रहिवासी विद्यार्थ्यांचे हिवाळी परीक्षेचे अर्ज कोणतेही परीक्षा या निर्णयामुळे दुष्काळी परिस्थितीत मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news