Nanded Political News : चिखलीकरांचा 'तो' कारनामा उधळण्यासाठी लोह्यात भाजपचाही अलिखित 'करारनामा'?

नगरपालिकेच्या प्रभाग १० (ब) मधील जागेच्या निकालाची उत्सुकता शिगेला
Nanded Political News
Nanded Political News : चिखलीकरांचा 'तो' कारनामा उधळण्यासाठी लोह्यात भाजपचाही अलिखित 'करारनामा'?File Photo
Published on
Updated on

Nanded Political News MLA Pratap Patil Chikhlikar

रमेश पांडे

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानानंतर आता सर्वपक्षीय उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा असली तरी जिल्ह्यातील काही प्रभागाच्या निकालाची उमेदवारांसह मतदारांनाही उत्कंठा लागून आहे. लोह्यातील प्रभाग १० (ब) मध्ये आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपा उमेदवाराला मतदान सुरू झाल्यावर अवघ्या काही तासांत राष्ट्रवादीत प्रवेश देण्याचा 'कारनामा' केला खरा, परंतु शेवटच्या काही तासात भाजपानेही एकाशी 'करारनामा' केल्याच्या चर्चेने या जागेच्या निकालाची उत्सुकता वाढवली आहे.

Nanded Political News
Nanded crime news| हदगाव शहरात वेश्या व्यवसायावर धाड, 4 महिला व 5 पुरुषांना अटक

आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचा राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. स्टार प्रचारक या नात्याने त्यांच्यावर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांची जबाबदारी होती. परंतु प्रचाराच्या कालावधीत आपला मतदारसंघ असलेल्या लोहा-कंधारमध्येच त्यांचे लक्ष केंद्रीत होते. लोह्यातील १० (ब) हा प्रभाग त्यांचा गड मानला जातो.

याआधी विविध चिन्हांवर त्यांनी या प्रभागात उमेदवार देऊन निवडूनही आणले. यावेळी भाजपानेही ही जागा प्रतिष्ठेची बनविल्याने चिखलीकरांना साम दंड-भेद नीतीचा अवलंब करावा लागला आणि सरतेशेवटी भाजपाच्याच उमेदवाराला 'मॅनेज' करावे लागले. यासाठी चिखलीकरांनी मतदानाचा अर्धा दिवस या प्रभागात घालवल्याची माहिती असून अठरापगड जातीचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रभागातील एका जागेसाठी वाट्टेल ती किंमत मोजणारी यंत्रणाही उमेदवाराच्या घरीच राबत होती.

Nanded Political News
Srikshetra Mahur : मुख्याध्यापकाचा दारुच्या नशेत विद्यार्थ्यांसमोरच डान्स

हा सर्व उठाठेव करूनही चिखलीकर ही जागा राखण्यात कितपत यशस्वी ठरतात हे निकालानंतर स्पष्ट होईलच, परंतु मतदानाच्या दिवशी एका राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला 'मॅनेज' करण्याची वेळ त्यांच्यावर का आली? त्यांची ही खेळी मतदारांना किती रुचली, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपला उमेदवारही सांभाळता आला नाही

ऐनवेळी फितूर झालेल्या भाजपच्या अधिकृत उमेदवारावर अद्याप तरी कुठलीच कार्यवाही झाली नसली तरी शिस्तीचा दिंडोरा पिटवणाऱ्या भाजपाला उमेदवारही सांभाळता आला नाही. 'वरून' प्रेशी रसद न मिळाल्याने कार्यकर्त्यांचा रोष वाढला आणि शेवटी कंटाळून त्याला राष्ट्रवादीत 'पलटी' मारावी लागल्याची जोरदार चर्चा आहे.

अन् घड्याळाचा 'काटा' रोखला

मतदानाच्या दिवशी दुपारनंतर सुरू झालेल्या या खेळाची सूत्रं भाजपाने एका माजी आमदाराच्या हाती सोपवली. चिखलीकरांचा डाव उधळण्यासाठी शेवटच्या काही तासात वरती 'कमळ' आणि खाली 'मशाल' असा प्रयोग करून घड्याळाचा 'काटा' रोखून धरला. हा प्रयोग यशस्वी झाल्यास चिखलीकरांनी केलेले पराकोटीचे प्रयत्न निष्फळ ठरतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news