

Principal dances in front of students while drunk
श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील एका जि.प.शाळेच्या मुख्याध्यापकाने दारूच्या नशेत विद्यार्थ्यांसमोरच चक्क डान्स केला. हा प्रकार समाज माध्यमात व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच पालकवर्गात संतापाची लाट उसळली असून शिक्षण विभागाच्या इभ्रतीचे वाभाडे निघाले आहे.
माहूर शहरापासून काही अंतरावरील एका गावातील जि.प. शाळेत सकाळच्या सत्रातच मुख्याध्यापकाने मद्यधुंद अवस्थेत मोठमोठ्याने ओरडत डान्स केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने विद्यार्थी प्रचंड घाबरले. तर काही विद्यार्थी भीतीने रडू लागले, तर काहींनी वर्गाबाहेर पळ काढला.
दरम्यान, एका पालकाने हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून समाजमाध्यमांवर शेअर केला. या प्रकारामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिस्तीचा, शिक्षण गुणवत्तेचा आणि शिक्षकवर्गाच्या जवाबदारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.