

हदगाव : शहरातील कल्याणनगर व तामसा रोड या दोन ठिकाणी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशाने पोलीस उपविभागीय अधिकारी भोकर व अर्धापूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्तने ४ डिसेंबर सायंकाळी ९ ते १० च्या दरम्यान धाड टाकण्यात आली. यामध्ये चार महिला व पाच पुरुषांना अटक करण्यात आली आहे. यामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शहरातील तामसा रोडवर गेल्या अनेक वर्षापासून देहविक्री व्यवसाय सुरू होता. कालांतराने तर खुलेआम रस्त्यावर बसून संबंधित महिला व चाळे करीत होत्या. यामुळे सर्वसामान्य जनतेला यांचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. तर आमदार बाबुराव पाटील कदम व खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या गावामध्ये उभा धिंगाणा होत असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले होते. तामसा रोडवर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे श्री दत्त कला वाणिज्य कॉलेज असून विद्यार्थी त्या ठिकाणाहून ये जा करत असतात तर पुढे समाज कल्याण मुलींचे वस्तीग्रह असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी ये जा करत असतात यांना न जुमानता थाटामध्ये दुकाने सजून वेश्याव्यवसाय सुरू होता.
याकडे हदगाव पोलीस स्टेशन आमदार व खासदार यांनी दुर्लक्ष केले परंतु अखेर पोलीस अधीक्षक यांनी धाडसी निर्णय घेऊन चार डिसेंबर रोजी सायंकाळी ९ ते १० च्या दरम्यान कल्याणनगर व तामसा रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून चार महिला व पाच पुरुष यांना अटक केली. व संबंधित वेश्याव्यवसाय करणाऱ्या मालकांना सुद्धा अटक करण्यात आली. तामसा रोड हे गजबजलेले ठिकाण असून रस्त्यावर चाळे होत असल्याने तेथील रहिवासी वैतागून गेले होते. अनेकवेळा हदगाव पोलीस स्टेशनला तक्रार देऊनसुद्धा त्यांनी काही केले नसल्याने त्यांच्यावर नाराजीचा सूर उमटला होता. अखेर पोलीस अधीक्षक यांनी ही कारवाई केल्यामुळे स्थानिक च्या नागरिकांत पोलीस अधीक्षक यांचे कौतुक होत आहे.