Nanded Crime : पिस्टलसह 4 जिवंत काडतुसे जप्त, दोघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; वजिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल
Nanded Crime News
पिस्टलसह 4 जिवंत काडतुसे जप्त, दोघांना अटकpudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः जिल्ह्यात गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जात असलेल्या ऑपरेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत एका गावठी पिस्तूलसह 4 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून एकूण 27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे व त्यांचे पथक 25 मे रोजी पेट्रोलिंगवर होते.

Nanded Crime News
Beed Crime : आष्टीत ‘धूम स्टाईल’ सोनसाखळी चोरांचा पर्दाफाश; दोन सख्खे मेहुणे गजाआड

या दरम्यान, एन.बी.एस. कॉलेजच्या बाजूला, बंदाघाट रोडवर एक इसम बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल बाळगून असल्याची अत्यंत गोपनीय माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी कसलाही वेळ न दवडता या परिसरात सापळा रचून छापा टाकला.

आरोपीकडून पिस्तूल जप्त; शस्त्र पुरवठादारही ताब्यात

या छाप्यात पोलिसांनी हरप्रितसिंघ ऊर्फ हॅप्पी महेंद्रसिंघ सुनकेवार (वय 41 वर्षे, रा. पांचाली हॉटेल जवळ, गुरुद्वारा चौरस्ता, नांदेड) याला संशयास्पद रितीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे विनापरवाना बेकायदेशीररित्या बाळगलेली एक लोखंडी गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Nanded Crime News
Dombivli Crime: डोंबिवलीत खुनाला अडीच वर्षांनी फुटली वाचा

आरोपी हरप्रितसिंघ याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हे शस्त्र तेजिंदरपालसिंघ ऊर्फ सोनू भागसिंघ लदड (वय 28 वर्षे, रा. गजानन महाराज मंदिरजवळ, मालेगाव रोड, नांदेड) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शस्त्र पुरवणाऱ्या तेजिंदरपालसिंघ यालाही बेड्या ठोकल्या. या दोन्ही आरोपींना मुद्देमालासह वजीराबाद पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पोलीस कॉन्स्टेबल राजीव बोधगीरे (खंडणी विरोधी पथक) यांच्या तक्रारीवरूनआरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news