Nanded Crime : साडेबावीस लाखांच्या मुद्देमालासह १९ गोवंशीय जनावरे मुक्त

नांदेडमध्ये ‘एलसीबी’चा छापा; ​ चार जणांना पोलिसांकडून बेड्या
Nanded Crime News
साडेबावीस लाखांच्या मुद्देमालासह १९ गोवंशीय जनावरे मुक्तpudhari photo
Published on
Updated on

नांदेड :जिल्ह्यात अवैधरीत्या होणाऱ्या गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे. कत्तलीच्या उद्देशाने एका शेडमध्ये आणि आयशर ट्रकमध्ये अत्यंत निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या १९ गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी एका आयशर वाहनासह एकूण २२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

​नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. नांदेडचे पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी जिल्ह्यातील अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या पथकाने उपविभाग इतवारा भागात गस्त वाढवली होती.

Nanded Crime News
Hingoli crime news | वसमत शहरालगत झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर छापा

​पथक देगलूर नाका परिसरात आले असता, त्यांना गाडेगाव रोडवरील मल शुद्धीकरण केंद्रासमोरील रस्त्यावर आणि एकबालनगर येथील मोहम्मद सादिक अब्दुल गफूर याच्या शेडमध्ये कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरे आणली जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी सकाळी पावणेनऊ वाजताच्या सुमारास मिळालेल्या ठिकाणी धाड टाकली.

या धाडसी कारवाईत पोलिसांनी आयशर टेम्पोमधून (क्र. MH 26-BE-4946) १० बैल, तर मोहम्मद सादिकच्या शेडमधून ८ बैल आणि १ गाय अशी एकूण १९ जनावरे जप्त केली. पोलिसांनी ११ लाख रुपयांचे वाहन आणि ११ लाख ६० हजारांची जनावरे जप्त केली आहेत.

Nanded Crime News
Gold Robbery Gang Arrest: नगरमध्ये ५२ लाखांची सोन्याच्या आमिषाने लूट; नांदेडमधून टोळी जेरबंद

​या प्रकरणी चालक झबीउल्लाखान झहीरउल्लाखान (वय ३०), व्यापारी शेख कलीम ऊर्फ कल्यु शेख अहमद (वय ३५), मोहम्मद सादिक अब्दुल गफूर (वय ४८) आणि मोहम्मद रिझवान मोहम्मद जाफर (वय ३०, सर्व रा. नांदेड) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व मुद्देमाल नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news