Hingoli crime news | वसमत शहरालगत झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर छापा

चार मोबाईल्ससह ५० हजारांचा मुद्देमाल जप्त, १२ जणांवर गुन्हा दाखल
Gambling Raid
Gambling RaidPudhari Photo
Published on
Updated on

वसमत, पुढारी वृत्तसेवा : शहरालगत उघडी नदीच्या पुलाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झन्नामन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात चार मोबाईलसह रोख रक्कम असा ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बारा जणांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मटका व जुगार अड्ड्यांवर छापे टाकून गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक पोलिस ठाण्याच्या पथकासह गुन्हे शाखेचे पथकही कामाला लागले आहे.

दरम्यान, वसमत शहरालगत उघडी नदीच्या पुलाजवळ काही जण झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार भुजंग कोकरे, ज्ञानेश्वर गोरे, आकाश टापरे, साईनाथ कंटे, नरेंद्र साळवे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी घटनास्थळावर १२ जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

पोलिस आल्याचे लक्षात येताच काही जुगाऱ्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून १९ हजार रुपये रोख व ३१ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल असा ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी जमादार गोरे यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी चंद्रकांत गायकवाड, विशाल सूर्यवंशी, विक्रांत सोनटक्के (रा. भेंडेगाव), शेख लतीफ, शेख हनीफ, आशिष सौदा, नितीन जाधव, शिवाजी काळे, स्वप्नील वाहुळे, संदीप थोरात (रा. वसमत), रुपेश थोरात (रा. कणेरगाव), मोतीराम नरवाडे (रा. कोठारी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जमादार डी. जी. मात्रे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news