Nanded police crackdown on cannabis smokers|जिल्ह्यात गांजा ओढणाऱ्या १८ जणांवर धडक कारवाई, ६ पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापे

Nanded police crackdown on cannabis smokers- जिल्ह्यात गांजा ओढणाऱ्या १८ जणांवर धडक कारवाई, ६ पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापे
cannabis smokers
cannabis smokers
Published on: 
Updated on: 

नांदेड - शहरासह जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध वापरावर आणि व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरोधात विशेष धडक मोहीम उघडली आहे. या मोहिमेंतर्गत दिनांक १५ व १६ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील ६ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या तब्बल १८ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई

इतवारा, भोकर, तामसा, नांदेड ग्रामीण, देगलूर आणि वजिराबाद या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील विविध सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी ही धडक कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करताना रंगेहाथ पकडलेल्या या आरोपींवर गुंगीकारक १८ औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) कलम ८ (क), २७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अमरनाथ प्रभाकर महाजन (रा. तामसा) पो. ठा. तामसा, देवानंद भगवान महाजन (रा. संभाजीनगर, तामसा), विशाल साहेबराव पिंपळसेकर (रा. मोशी, पुणे; ह.मु. तामसा), शंतनु गंगाधर परळे (रा. तामसा, ता. हदगाव), मोहम्मद साजेब मोहम्मद चांद पाशा (रा. दुल्हेशाहा रहमान नगर, नांदेड), अनिल दिलीप उगडे (रा. चिराग गल्ली, इतवारा, नांदेड) , साहिलखान जावीदखान पठाण (रा. पीरबुरानगर, नांदेड), शेख फारुख शेख आयुब (रा. देगाव चाळ, वजिराबाद, नांदेड), शेख अमन शेख नईम (रा. गंगा चाळ, वजिराबाद, नांदेड), शेख मुख्तार शेख सत्तार (रा. खुदबेईनगर, हबीबीयों कॉलनी, इतवारा, नांदेड), मोहम्मद मुक्तार पिता अहमद अयुब (रा. खुदबे नगर, नांदेड), संदीप शिवाजी पवार (रा. असदवन, नांदेड), शेख हुसेन शेख खादर (रा. निजामाबाद; ह.मु. हिंगोली नाका, नांदेड), बाबु मिया शेख (रा. आसारानगर, नांदेड; ह. मु. मोहम्मद नगर, भोकर), साजिद खाजा मिया शेख (रा. नरंगल रोड, देगलूर), आकाश अशोकराव सोनटक्के (रा. शारदा नगर, देगलूर), लक्ष्मीकांत वामनराव कांबळे (रा. एकता नगर, भायेगाव रोड, देगलूर), पियुष आनंदराव गायकवाड (रा. गीता नगर, भायेगाव रोड, देगलूर)

सामग्री पंचासमक्ष नष्ट

इतवारा, तामसा, नांदेड ग्रामीण, भोकर आणि वजिराबाद पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून गांजा पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिलमी, तंबाखू मिश्रित गांजासदृश पदार्थ, माचीस बॉक्स आणि जळालेल्या काड्या यांसारखे मुद्देमाल जप्त केला. कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत पंचासमक्ष हा सर्व मुददेमाल जाळून नष्ट करण्यात आला आहे.

cannabis smokers
Nanded police seize illegal sand assets |वाळू तस्करांवर कारवाई; ८०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

'झिरो टॉलरन्स'चे धोरण कायम राहणार

नांदेड जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी सेवन करणाऱ्यांवर पोलिसांनी 'झिरो टॉलरन्स' (अजिबात सहन न करणे) धोरण अवलंबले असून, ही धडक मोहीम भविष्यातही आणखी तीव्र केली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात अमली पदार्थांचे सेवन किंवा विक्री करणाऱ्यांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

cannabis smokers
Sand Smugglers : नांदेड जिल्ह्यात वाळू तस्करांवर मोठी कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.