Nanded Crime| गुन्हेगारीवर लगाम; नांदेड पोलिसांकडून शस्त्रांसह आरोपी ताब्यात

दोघांना बेड्या ः पिस्टल, खंजीरसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
Nanded Crime News
पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना बेड्या ठोकत मुद्देमाल जप्त केला.pudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः नांदेड शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी रात्री विमानतळ पोलिस ठाण्याच्या पथकाने माता गुजरीजी चौकात सापळा रचून दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक पिस्टल, दोन धारदार खंजीर आणि एक दुचाकी, असा एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या सूचनेनुसार विशेष पेट्रोलिंग सुरू आहे. बुधवारी रात्री सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक दर्शनी आणि विमानतळ पोलिस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालत असताना, त्यांना माता गुजरीजी चौकात काही संशयास्पद तरुण असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ या भागात छापा टाकला.

Nanded Crime News
Gadchiroli News | अवैध दारुविक्रेत्यांविरोधात पोलिसांची कारवाई, पावणे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी संशयावरून खुशालसिंघ नानकसिंघ गिल (वय 22, रा. संभाजीनगर, सध्या रा. नंदिग्राम सोसायटी, नांदेड) याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक लोखंडी पिस्टल (मॅक्झिनसह) आणि एक धारदार खंजीर मिळून आला. तपासात खुशालसिंघ हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यासोबत असलेला दुसरा आरोपी जयमितसिंग बलवीरसिंग शाहू (वय 22, रा. हिंगोली, सध्या रा. अबचलनगर, नांदेड) याच्याकडेही एक धारदार खंजीर सापडला.

Nanded Crime News
Beed crime news: दोन लाखांचं बनावट लग्न प्रकरण! नवरीसह बनावट मावशी पोलिसांच्या ताब्यात, दोघे अद्याप फरार !

ही यशस्वी कामगिरी पोलिस सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे व त्यांच्या पथकाने केली. आरोपींना पुढील कारवाईसाठी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी 25 हजार रुपये किमतीची पिस्टल, 5 हजार रुपयांचा मोबाईल, 5 हजार रुपये किमतीचे दोन खंजीर आणि 70 हजार रुपयांची विना क्रमांकाची मोटारसायकल, असा एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news