Gadchiroli News | अवैध दारुविक्रेत्यांविरोधात पोलिसांची कारवाई, पावणे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड, रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई
Gadchiroli News | अवैध दारुविक्रेत्यांविरोधात पोलिसांची कारवाई, पावणे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त
Gadchiroli News | अवैध दारुविक्रेत्यांविरोधात पोलिसांची कारवाई, पावणे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

गडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड घालून देशी, विदेशी दारुसह सुमारे १२ लाख ७४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कारवामुळे अवैध दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

अजय चिचघरे,रा.खरपुंडी, ता. गडचिरोली असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. अजय चिचघरे हा आपल्या सहकाऱ्यांसह चारचाकी वाहनातून किरकोळ विक्रेत्यांना दारु पुरवठा करणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नवरगाव येथे सापळा रचून समोरुन येणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यात ३ लाख १६ हजार ८०० रुपये किमतीच्या बिअरच्या २२ पेट्या, १५ हजार रुपये किमतीच्या आरएस कंपनीच्या दारुच्या १०० बाटल्या, ४६ हजार रुपयांच्या २३ बाटल्या, ४३ हजार २०० रुपयांच्या हायवर्ड बिअरच्या ६ पेट्या आणि यू.पी.१६ डीबी ०५९० क्रमांकाची ८ लाख रुपये किमतीचे टाटा कंपनीचे वाहन असा एकूण १२ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलिसांनी अजय चिचघरेवर गुन्हा दाखल केला. या घटनेतील दोन फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. पोटेगावच्या पोलिस उपनिरीक्षक सीमा किंकर तपास करीत आहेत. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलिस निरीक्षक समाधान दौड, अंमलदार रोहित गोंगले, प्रशांत गरफडे, रामदास उईनवार यांनी ही कारवाई केली.

कुरखेडा पोलिसांनी स्कूटीमधून पकडल्या देशी दारुच्या पेट्या

आज मध्यरात्री कुरखेडा पोलिसांनी नान्ही-तळेगाव मार्गावर नाकेबंदी करुन समोरुन येणाऱ्या स्कूटीचालकाची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी दारुच्या ४ पेट्या आढळून आल्या. बाजारात या दारुची किमत २८ हजार रुपये एवढी आहे. पोलिसांनी ही दारु आणि २५ हजार रुपये किमतीची स्कूटी असा एकूण ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी आकाश तुळशीराम कोरेटी(२८),रा.नान्ही याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कुरखेड्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ, उपनिरीक्षक संदीपकुमार ताराम, हवालदार शेखलाल मडावी, शिपाई संदेश भैसारे, नरसिंग कोरे व राकेश येळणे यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news