Nanded News : ५ ते ७ हजार द्या, अन् टेम्पो भरून लाकडे न्या...

माळरान उजाड होते, अन् वन विभाग मालामाल
Nanded News
Nanded News : ५ ते ७ हजार द्या, अन् टेम्पो भरून लाकडे न्या...file photo
Published on
Updated on

Nanded News: Pay 5,000 to 7,000, and take away a tempo-load of firewood

विठ्ठल फुलारी

भोकर : भोकर तालुक्यात होत असलेल्या वृक्षतोडीबाबत अजून एक माहिती समोर आली असून शेतकऱ्यांकडून व्यापारी झाडे खरेदी करतात आणि ती तोडून विकतात. हे सर्व शहर व ग्रामीण वनपालला माहीत असते त्यांना फक्त ग्रामीण भागातील वनपालला ५ ते ७ आणि भोकर शहरातील वनपाल एवढेच पैसे दिले अवैध मागनि ही लाकडे कुठेही नेवू शकतात. यामुळे तर उघड्या डोळ्यांनी वन विभाग हे पहात आहे.

Nanded News
Forest Department Action : भोकरदनमध्ये वन विभागाचा सर्जिकल स्ट्राईक; लाकूड जप्त

पर्यावरणाचा ऱ्हास हा मानवी अस्तित्त्वासाठी सर्वात मोठा धोका बनलाय. याचे चटकेही बसायला सुरुवात झाली आहे. मागील अनेक वर्षापासून आपण केलेल्या चुकांची जाणीव आता होऊ लागली असली तरी चुकीचे काम आजही थांबत नसल्याने याचा फटका निसर्गाच्या कुशीत राहाणाऱ्या प्राणीमात्रांना वसत आहे. भारतामध्ये झपाट्याने होत असलेल्या जंगलतोडीमुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

अलीकडे आयएसआरओ यांनी प्रसिद्ध केलेल्या उपग्रह चित्रांनी एक भयावह वास्तव समोर आणले आहे. या चित्रांनुसार, मागील १५ वर्षांत मोठ्या प्रमाणावर जंगलांचा नाश झाला आहे. पूर्वी एका हेक्टरमध्ये सुमारे १००० झाडे असायची, परंतु आता ही संख्या घटून केवळ ५० च्या आसपास आली आहे.

Nanded News
illegal tree cutting : अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची धडक कारवाई ; कडुलिंब लाकडाचा साठा जप्त

ही घट केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर जैवविविधता आणि हवामान संतुलनासाठीही गंभीर इशारा आहे. झाडांची संख्या कमी झाल्यामुळे तापमान वाढत आहे, तसेच वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासही नष्ट होत आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर वेळेत ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि वन विभागातील काही लालची कर्मचाऱ्यांमुळे झाडांची कत्तल केली जात आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांकडून व्यापारी झाडे खरेदी करतात आणि ती तोडून विकतात. हे सर्व शहर व ग्रामीण वनपाल ला माहीत असते त्यांना फक्त ग्रामीण भागातील वनपाल ला ५ ते ७ आणि भोकर शहरातील वनपाल एवढेच पैसे दिले अवैध मार्गान हि लाकडे कुठे घेऊन जातात. याला आळा बसणं गरजेचे असून संबंधित वनपाल व वनरक्षक यांच्यावर कारवाई करून या भागात तीन पटीने वृक्षलागवड करावी आणि त्याची जोपासना केली तरच पुन्हा हे रान हिरवाईने नटणार आहे.

हाळदा परिसरात झालेल्या वृक्षतोड बाबत वन कर्मचाऱ्यांनी पंचनामे केली आहेत. तोडलेली काही झाडे ही जप्त करण्यात आली आहेत. ही कार्यवाही चालू असून यामध्ये जे कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
अंगद खटाणे वनपरिक्षेत्र अधिकारी, भोकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news