Nanded News : दोन शासकीय रुग्णालयांत ३ कोटी ६५ लाखांचा अपहार !

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट देयके (बील्स) तयार करून तसेच 'सेवार्त' प्रणालीत फेरफार करून तब्बल ३ कोटी ६५ लाख १२ हजार ४५३ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

Nanded News: Misappropriation of ₹3.65 crore across two government hospitals!

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट देयके (बील्स) तयार करून तसेच 'सेवार्त' प्रणालीत फेरफार करून तब्बल ३ कोटी ६५ लाख १२ हजार ४५३ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय माणिकराव पेरके यांच्या फिर्यादीवरून हदगाव आणि मांडवी (ता. किनवट) पोलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोग्य विभागातील या कोट्यवधींच्या घोटाळ्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Crime News
Nanded | प्रस्थापितांच्या मांदियाळीत लिंगायत-आर्यवैश्य प्रतिनिधी बँकेतून हद्दपार !

पहिले प्रकरण हदगाव येथील सरकारी दवाखान्यात घडले. आरोपी डॉ. संदीप हनमंतराव दरबस्तवार व संतोष सोत्रपा दरगु (दोघे रा. सरकारी दवाखाना, हदगाव) यांनी संगनमत करून हेतू पुरस्सर बेकायदेशीर व खोटी देयके तयार केली. ही देयके कोषागार डे कार्यालयात सादर करून ४४ लाख १२ ८. हजार ५०० रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करत शासकीय निधीचा अपहार केला. या प्रकरणी डॉ. पेरके यांच्या तक्रारीवरून हदगाव पोलिस ठाण्यात गन्हा दाखल झाला असून, पोलिस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत मांडवी (ता. किनवट) येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम दासराव राठोड (वय ४५, रा. मांडवी) याने जून २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत बेसिक एरिअर्सच्या (मूळ थकबाकी) नावाखाली मोठा गैरव्यवहार केला.

Crime News
Nanded District Bank Election Results - जिल्हा बँकेवर शेतकरी विकास पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व

आरोपीने शासकीय 'सेवांत' प्रणालीमध्ये वेतनाची चुकीच्या पद्धतीने नोंद करून बनावट देयके तयार केली आणि कोषागार कार्यालयात सादर करून तब्बल ३ कोटी २० लाख ९९ हजार ९५३ रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी देगलूर शासकीय रुग्णालयातील ९० लाखांचा अपहार प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर आणखी दोन वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयातील कोट्यवधींच्या आर्थिक गैव्यवहाराचा भांडाफोड झाल्यामुळे एका आठवड्यात तीन अपहाराचे प्रकरण समोर आल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news