Nanded News : बिलोली जिल्हा मध्यवर्ती बँकेत ३ लाख २२ हजारांचा अपहार

अनुदानाचा निधी स्वतःच्या खात्यावर केला आरटीजीएस; शाखा व्यवस्थापकासह कॅशियरवर गुन्हा
Fraud Case |
Nanded News : बिलोली जिल्हा मध्यवर्ती बँकेत ३ लाख २२ हजारांचा अपहारFile Photo
Published on
Updated on

Nanded News: Misappropriation of ₹3.22 lakh at Biloli District Central Bank

नांदेड, पुढारी वृत्तसेवा बिलोली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने आणि कॅशियरने संगनमत करून शासकीय अनुदानाचा तब्बल ३ 1 लाख २२ हजार १०० रुपयांचा निधी स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर वळवून बँकेची आणि न सभासदांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात दोन्ही बँक अधिकाऱ्यांविरुद्ध विविध . कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud Case |
‌Nanded Bank Fraud : ‘एसबीआय‌’ अधिकाऱ्यांचा गहाण सोन्यावर डल्ला!

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिनांक २४ एप्रिल २०२६ ते १६ मे २०२६ या कालावधीत बिलोली येथील ने मध्यवर्ती सहकारी बँकेत हा गैरव्यवहार झाला. बँकेचे कॅशियर आरोपी प्रभू भुजंगा इबितवार (वय ५५ वर्षे, रा. नायगाव) आणि शाखा व्यवस्थापक व दीपक देवीदास देशमुख (वय ६० वर्षे, रा. देगलूर) या दोघांनी संगनमत केले. शासकीय योजनेअंतर्गत आलेला ३,२२,१०० रुपयांचा निधी आरोपी कॅशियर प्रभू इबितवार याने आपल्या स्वतःच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खाते क्रमांक ४१८५२६०४३७२ वर आरटीजीएस द्वारे वर्ग करून घेतला.

हा निधी त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरून बँक व सभासदांचा विश्वासघात केला. पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरू या संपूर्ण आर्थिक फसवणूक प्रकरणाची गंभीर दखल घेत फिर्यादी राजेश मारुतीराव पाटील (वय ५५ वर्षे, रा. कासराळी, ता. बिलोली, जि. नांदेड) यांनी बिलोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रभू इबितवार आणि दीपक देशमुख यांच्याविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव हे करीत असून, या घोटाळ्यात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Fraud Case |
Crime News : बनावट सहीने ९ लाख हडप; बुरखाधारी महिला जेरबंद

सभासदांमध्ये संताप : शासकीय अनुदानाचा पैसा गरजू सभासदांपर्यंत पोहोचण्याऐवजी थेट बँकेच्याच जबाबदार अधिकाऱ्यांनी हडप केल्याचे समोर आल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बँकेच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि सभासदांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news