Crime News : बनावट सहीने ९ लाख हडप; बुरखाधारी महिला जेरबंद

क्रांती चौक पोलिसांची कारवाई; फसवणुकीची संपूर्ण रक्कम हस्तगत
 Fraud case
Crime News : बनावट सहीने ९ लाख हडप; बुरखाधारी महिला जेरबंदFile Photo
Published on
Updated on

₹9 Lakh Embezzled Using Forged Signature; Burqa-wearing woman arrested

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील अदालत रोडवरील येस बँकेत हरवलेल्या चेकवर हुबेहूब बनावट सही करून एका ८० वषीय निवृत्त डॉक्टर महिलेच्या खात्यातून तब्बल ९ लाख रुपये लांबवणाऱ्या बुरखाधारी महिलेला क्रांती चौक पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अतिशय कौशल्याने तपास करत या गुन्ह्याची उकल केली असून, आरोपी महिलेकडून हडपलेली संपूर्ण ९ लाखांची रक्कम हस्तगत केली आहे.

 Fraud case
Crime News : अवैध गॅस रिफिलिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत खंडणी उकळली

धक्कादायक बाब म्हणजे, चेकद्वारे बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर तिने तिच्या ८ वर्षांच्या निष्पाप मुलीला सोबत नेले होते. मात्र अखेर याच मुलीच्या शाळेमुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आले. बुशरा शेख मुस्ताक शेख (३६, रा. चिश्तिया कॉलनी, गल्ली नं. ३, एन-६ सिडको) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

डॉ. असमत फातीमा मुख्तार (८०, रा. असमत हॉस्पिटल, लेबर कॉलनी) असे फसवणूक झालेल्या निवृत्त महिला डॉक्टरचे नाव आहे. त्यांचे येस बँकेत बचत खाते असून, नऊ महिन्यांपूवी त्यांचा एक चेक गहाळ झाला होता. हा चेक आरोपी महिला बुशरा शेख हिला बँकेत पैसे भरण्याची स्लिप भरत असताना सापडला होता.

 Fraud case
Digital Arrest : निवृत्त प्राध्यापकाचे ३२ लाख हडपणाऱ्या दोन भामट्यांना बेड्या

विशेष म्हणजे, या चेकच्या मागे डॉ. असमत यांनी आधीच एक सही केलेली होती. याचा गैरफायदा घेत बुशरा हिने चेकच्या पुढच्या बाजूला तशीच हुबेहूब बनावट सही केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी ९ मे रोजी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक आयुक्त सागर देशमुख, पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधाकर पाटील, अंमलदार भावसिंग चव्हाण, शरद देशमुख, बने, कांबळे आणि मट्टे यांच्या पथकाने केली.

सीसीटीव्हीवरून काढला माग

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपी महिला पूर्णपणे बुरख्यात असल्याने तिची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून सदर महिलेचा शोध घेतला.

मुलीच्या शाळेतून मिळाला मुख्य धागा !

आरोपी महिला सेव्हनहिल परिसरातच कुठेतरी गायब झाल्याचा अंदाज बांधून तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुधाकर पाटील यांनी रणनीती बदलली. त्यांनी तात्काळ सेव्हनहिल परिसरातील सर्व शाळा गाठल्या. सीसीटीव्ही फुटेजमधील मुलीचा फोटो दाखवून शाळांमध्ये चौकशी सुरू करण्यात आली. अखेर एका शाळेतून त्या मुलीची आणि तिच्या बुरखाधारी आईची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या मुख्य धाग्यावरून क्रांती चौक पोलिसांनी सिडकोतील चिश्तिया कॉलनीतून बुशरा शेख हिला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news