Nanded News : १०० दिवस कृती आराखड्यातील अनेक कामे अपूर्णच

खा. अशोक चव्हाणांकडून मनपा कामकाजाची झाडाझडती
Nanded News
Nanded News : १०० दिवस कृती आराखड्यातील अनेक कामे अपूर्णचfile photo
Published on: 
Updated on: 

Nanded News: Many tasks from the 100-day action plan remain incomplete

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील गोवर्धन घाट, सिडको व तरोडा गॅस शवदाहिनी, आहिल्यादेवी होळकर स्मारक, अटल बिहारी वाजपेयी पुतळा, स्मार्ट ट्राफिक सिग्नल, इलेक्ट्रीक जार्जिंग पाईंट, धोकादायक विद्युत वाहिनी भूमिगत करणे, सीसीटीव्ही, कस्तुरबा मातृसेवा केंद्र शिवाजी नगर येथे बी.पी. केअर युनिट व शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुल करणे आदी नांदेड महापालिकेच्या १०० दिवस कृती आराखड्यातील अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे खा. अशोक चव्हाण यांनी महापालिकेच्या कामकाजाची बुधवारी झाडाझडती घेतली. प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यामुळे मनपा प्रशासनाची झोप उडाली आहे.

Nanded News
Nanded Accident News: धर्माबाद-बाभळी फाटा मार्गावर कार-कंटेनरची धडक; १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकासकामे जलदगतीने पूर्ण व्हावीत आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा तात्काळ निपटारा व्हावा तसेच जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या 'अल-निनों'च्या प्रभावामुळे यंदा संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातही सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे.

या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे उपलब्ध असलेला मर्यादित जलसाठा अत्यंत काटकसरीने वापरून पुढील ऑगस्ट २०२७ पर्यंत संपूर्ण नांदेड शहराला अखंडित पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. पाण्याचे हेच गंभीर संकट ओळखून यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महानगरपालिका कार्यालयात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली.

या बैठकीत दुष्काळजन्य परिस्थितीत करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याचे नियोजन, शहरातील रस्ते, स्वच्छता, आणि वाहतूक कोंडी यांसारख्या विविध ज्वलंत मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व अधिकाऱ्यांना सक्त निर्देश देण्यात आले. बैठकीच्या प्रारंभी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सद्यस्थितीत विष्णुपुरी धरण व इतर ठिकाणी शहरासाठी राखीव असलेल्या पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती सादर केली त्याचप्रमाणे पाणी पुरवठा विभागाने गेल्या एक ते दोन महिन्यांमध्ये केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर केला.

Nanded News
Nanded News : रोहित पवारांच्या स्टंटबाजीवर खा. अशोक चव्हाणांचा टोला

पाणी पुरवठा विभागाने मागील काही कालावधीत शहरातील अवैध पाणी वापर रोखण्यासाठी १८७ अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या आहेत. त्याचप्रमाणे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तातडीने २८६ ठिकाणी गळती दुरुस्ती करण्यात आली असून सार्वजनिक व इतर ठिकाणी पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी ८७ नवीन तोट्या बसविण्यात आल्या असून २३६ अस्वामित्व नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली. त्याचप्रमाणे डंकीन येथील मलशुद्धीकरण केंद्रातून २ एमएलडी सांडपाणी पुनर्वापर करून शहरात विविध ठिकाणी पावसाचे पाणी साठवण्यासाठी २१ रिचार्ज पिट तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीला महापौर कविता संतोष मुळे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपमहापौर दीपकसिंह रावत, सदिच्छा सोनी पाटील, निरंजना लांडगे, महेश कनकदंडे, किशोर स्वामी, संतोष मुळे यांच्यासह सर्व अधिकारी, अभियंता, विविध प्रभागातील नगरसेवक, विविध भागांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करावे आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश खासदार अशोकराव चव्हाण यांनी बैठकीच्या समारोपाप्रसंगी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.