Nanded News : रोहित पवारांच्या स्टंटबाजीवर खा. अशोक चव्हाणांचा टोला

केवळ टीआरपी वाढवण्याचा कार्यक्रम असल्याचा घणाघात
Nanded News
Nanded News : रोहित पवारांच्या स्टंटबाजीवर खा. अशोक चव्हाणांचा टोलाfile photo
Published on: 
Updated on: 

MP Ashok Chavan criticizes Rohit Pawar’s ‘stunt’ tactics

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : राजकारणामध्ये स्टंटबाजी करून रोज मीडियामध्ये टीआरपी वाढला पाहिजे, हाच आमदार रोहित पवार यांचा एकमेव कार्यक्रम आहे, असा टोला भाजपा नेते, खासदार अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. त्यांनी बुधवारी रात्री नांदेड महानगरपालिकेतील बैठकीनंतर माध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी रोहित पवार यांच्यासह विरोधकांवर जोरदार टीका केली.

Nanded News
Crime News : घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ जण अटकेत, सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोनिया गांधी यांच्या पुस्तकाबाबत विचारले असता, त्यांनी आपले अनुभव कथन केले आहेत. पुस्तक वाचल्यावरच त्यावर बोलता येईल, असे ते म्हणाले. राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा उरलेला नसल्याचे चव्हाण म्हणाले.

त्यामुळे केवळ स्टंटबाजी करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न सुरू आहे. केवळ टीव्हीवर दिसण्यासाठी केलेले राजकारण फार काळ टिकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी वैयक्तिक आरोप करण्याची सवय विरोधकांना लागली असल्याचे ते म्हणाले. यावेळी महापौर कविता मुळे, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपमहापौर दीपकसिंह रावत, अॅड. महेश कनकदंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Nanded News
Nanded News | हिमायतनगर नगरपंचायत अपहार प्रकरण; बांधकाम लिपिकाला क्लीन चिट

आरोप करायचे अन् प्रसिद्धी मिळवायची...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोहित पवार यांनी केलेल्या बेछूट आरोपांचा चव्हाण यांनी खरपूस समाचार घेतला. पुराव्याशिवाय केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करणे हे योग्य नसल्याचे ते म्हणाले. आरोप करायचे, मीडियामध्ये झळकायचे आणि नंतर पळ काढायचा, अशी पद्धत लोकशाहीला घातक असल्याची टीका त्यांनी केली. ज्यांना आरोप करायचे आहेत, त्यांनी पुरावे घेऊन समोर यावे, कागदपत्रे दाखवावीत, असे आव्हानही त्यांनी दिले. केवळ सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून आणि पत्रकार परिषद घेऊन राजकारण होत नाही, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.