Nanded News : बोरगडी येथे वीज पडून गाय गंभीर तर वासरू ठार

पार्डी येथील वाहून गेली शेतकऱ्यांची म्हैस पुराच्या पाण्यात
Lightning Strike
Nanded News : बोरगडी येथे वीज पडून गाय गंभीर तर वासरू ठार File Photo
Published on
Updated on

Nanded News : Cow seriously injured and calf killed by lightning in Borgadi

हिमायतनगर प्रतिनिधी /तालुक्यातील शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात बोरगडी शिवारात वीज कोसळून दुर्दैवी घटना घडली. कष्टकरी शेतकरी प्रभाकर संभाजी भाकरे यांच्या गट क्र. २१२ शिव ारातील गोठ्यावर वीज कोसळल्याने गाय गंभीर तर एका वासराचा जागीच मृत्यू झाला आहे तर पारडी येथील शेतकऱ्यांच्या सात म्हशी, दोन बैल पुराच्या पाण्यात वाहून गेले होते.

Lightning Strike
Marathwada rain news: सोयाबीनला कोंब फूटू लागल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली; हिमायतनगर तालुक्यात मोठा फटका

यातील सहा म्हशी तर दोन बैल वाचविण्यात यश आले तर एक म्हैस अद्यापही सापडली नाही. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तीर्थक्षेत्र बोरगडी येथील शिवारात वीज पडून शेतकरी प्रभाकर भाकरे यांच्या शेतातील महत्त्वाचे साहित्य मोटारपंप, पाईप, स्पिंलकर, खत व इतर शेतीसाठी वापराचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

या अचानक झालेल्या नुकसानीमुळे भाकरे कुटुंब आर्थिक संकटात सापडले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान झालेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील पारडी शिवारातील शेतकरी राजू विठ्ठल रौतुलवाड यांच्या गट क्र. ८४ मधील शेतशिवारातील आखाड्यावर सात म्हशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. स्थानिकांनी केलेल्या शोधाशोधनंतर सहा म्हशी आढळून आल्या आहेत, मात्र एक म्हैस अजूनही बेपत्ता असून, यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचे पारडी येथील नागरिकांनी सांगितले आहे.

Lightning Strike
आभाळ फाटले... शेत करपले........

गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रासह नदिड जिल्ह्यात जोरदार पावसाचा धडाका सुरू असून विजांचा कडकडाट व वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आधीच अठरा विश्व दारिद्र्याचा सामना करावा लागत असताना नैसर्गिक आ-पत्तीमुळे उभे राहणे कठीण झाले आहे. या घटनेबाबत स्थानिक शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असून, तत्काळ पंचनामा करून योग्य ते नुकसानभरपाई मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गान प्रशासनाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news