Nanded news: विकास कागदावरच!  रस्त्याविना नांदेडच्या भाटु तांड्यातील गर्भवती महिलेला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ

पक्का रस्ता कधी मिळणार?; सतत पाठपुरावा आणि मागणी करूनही हा तांडा अद्यापही पक्क्या रस्त्यापासून वंचितच
Nanded news: विकास कागदावरच!  रस्त्याविना नांदेडच्या भाटु तांड्यातील गर्भवती महिलेला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
Published on
Updated on

मुखेड : तालुक्यातील शिकारा ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या भाटु तांड्यावरील एका गर्भवती महिलेला पक्के रस्ते नसल्यामुळे थेट खाटेवरून मुखेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणावे लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सतत पाठपुरावा आणि मागणी करूनही हा तांडा अद्यापही पक्क्या रस्त्यापासून वंचितच राहिला आहे.

Nanded news: विकास कागदावरच!  रस्त्याविना नांदेडच्या भाटु तांड्यातील गर्भवती महिलेला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
Nanded rain news: सलग 3 दिवसांच्या मुसळधार पावसाने जनजीवनही झाले विस्कळीत

शिकारा ग्रामपंचायतीपासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर असलेला हा तांडा असून, या तांड्याला साधा पाणंद रस्तासुद्धा उपलब्ध नाही. येण्या-जाण्यासाठी केवळ अरुंद पाऊलवाट असल्याने येथे कोणतेही वाहन पोहोचू शकत नाही. परिणामी, तांड्यावर एखादी गर्भवती महिला असो वा गंभीर आजारी रुग्ण, त्याला उपचारासाठी झोळीत किंवा खाटेवर घालूनच आणावे लागते, अशी माहिती येथील रहिवासी शिवाजी राठोड यांनी दिली.

Nanded news: विकास कागदावरच!  रस्त्याविना नांदेडच्या भाटु तांड्यातील गर्भवती महिलेला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
Nanded News : दोन शासकीय रुग्णालयांत ३ कोटी ६५ लाखांचा अपहार !

शालेय शिक्षण घेण्यासाठी लहान मुलांनाही याच झाडीतून आणि अरुंद वाटेवरून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. मात्र, रस्त्याच्या या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत प्रशासन अद्यापही गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व नाराजी दिसून येत आहे.

Nanded news: विकास कागदावरच!  रस्त्याविना नांदेडच्या भाटु तांड्यातील गर्भवती महिलेला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
Nanded News : केळीच्या दरात मोठी घसरण; उत्पादक चिंतेत

मागील काही वर्षांपूर्वी मनरेगा अंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती; मात्र त्या काळात या तांड्याचा रस्ता का घेतला गेला नाही, हे अद्यापही गुपितच आहे. शासनाच्या वतीने 'तांडा वस्ती सुधार योजने'अंतर्गत तांडावासीयांना मूलभूत सुविधा दिल्या जात आहेत. याच धर्तीवर, भविष्यात या तांड्याचा रस्ता व अपूर्ण विकासाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जावा, अशी जोरदार अपेक्षा आता तांडावासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news