Nanded News : फायनान्सच्या तगाद्याला कंटाळलेल्या आणखी एका शेतकऱ्याने जीवन संपवले

पैसे भरले नाही, तर घराला कुलूप लावण्याची धमकी; चौघांवर गुन्हा
Nanded News
Nanded News : फायनान्सच्या तगाद्याला कंटाळलेल्या आणखी एका शेतकऱ्याने जीवन संपवलेfile photo
Published on: 
Updated on: 

Nanded News: Another farmer, driven to despair by pressure from a finance company, has ended his life

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या फायनान्स कंपनीत झालेल्या मृत्यूनंतर संताप शांत होण्यापूर्वीच, खाजगी फायनान्स कंपन्यांच्या वसुलीचा सक्तीचा तगादा आणि दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे नैराश्यात आलेल्या एका हवालदिल शेतकऱ्याने रेल्वेसमोर जीव दिल्याची अत्यंत संतापजनक व दुर्दैवी घटना नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात उघडकीस आली आहे.

Nanded News
Nanded Shaktipeeth Expressway| मानवाडी फाटा येथे शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

दत्ता मोहन उमाटे (वय ५७, रा. गणीपूर, पो. सोमठाणा, ता. उमरी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी महिंद्रा होम फायनान्सच्या चार मुजोर कर्मचाऱ्यांविरुद्ध लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, मृत शेतकरी दत्ता उमाटे यांनी सन २०१८ मध्ये राहते घर बांधण्यासाठी महिंद्रा होम फायनान्स शाखा नांदेड येथून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ते नियमितपणे व्याजाचे हप्ते भरत असतानाही, मागील काही महिन्यांपासून उरलेल्या एक लाख रुपयांच्या वसुलीसाठी फायनान्सचे कर्मचारी वारंवार सक्तीचा तगादा लावून मानसिक छळ करत होते.

गत १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्ता उमाटे यांना सर्पदंश झाल्याने ते रुग्णालयात उपचाराखाली होते. ते जीवनाशी झुंज देत असतानाच, फायनान्सचे कर्मचारी थेट त्यांच्या घरी पोहोचले. "पैसे भरत नाही, तर घराला कुलूप लावू," अशी धमकी देत त्यांनी कुटुंबीयांना बेदम दमदाटी केली. एवढेच नव्हे तर, फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी उलट संबंधित कुटुंबाविरुद्ध उमरी पोलिस ठाण्यात मारहाणीची खोटी तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवून घेतला. या दुहेरी अन्याय आणि अपमानामुळे दत्ता उमाटे हे गेल्या काही दिवसांपासून तीव्र मानसिक तणावाखाली वावरत होते.

Nanded News
Nanded Accident| भरधाव कार दुकानात घुसली; एक ठार, दोघे गंभीर

मात्र ते परतलेच नाही

तणावात असलेले दत्ता उमाटे हे १४ नोव्हेंबर रोजी सकाळी कर्जफेडीसाठी पैसे जुळवतो म्हणून घराबाहेर पडले, मात्र ते परतलेच नाहीत. दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास बोळसा रेल्वे स्थानकाजवळ (कि.मी. ३९९/१५) ते गंभीर जखमी अवस्थेत आढळले. उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. फायनान्सच्या कर्मचाऱ्यांच्या सततच्या छळाला व सामाजिक अपमानाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

पोलिसांची कारवाई : चार जणांवर गुन्हा

मृतकाच्या पत्नी पार्वतीबाई दत्ता उमाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिस ठाण्यात महिंद्रा होम फायनान्सचे कर्मचारी राम चांदोबा गवलवाड (रा. देगलूर), राजू चोडर्डीकर, सचिन लांडगे आणि अरविंद जाधव यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३५१ (१) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोविंद बिराजदार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.